पुणे (महाराष्ट्र) : मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. मंदिर प्रवेश हा केवळ महिलांनी समानतेसाठी दिलेला लढा होता. (यातूनच बाळ यांची हिंदूंच्या प्रथा मोडण्याची, तसेच प्रसिद्धीस पावण्याची वृत्ती दिसून येते. ज्यांना मुळात देवच मान्य नाही, त्यांनी देवाच्या दर्शनाच्या संदर्भात बोलणे ही श्रद्धाळू हिंदूंना ठोकरण्यासाठी केलेली नसती उठाठेवच आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील. देव थकला आहे, तो दुबळा असून स्वतःचे रक्षण करू शकत नाही. स्त्री ही शक्ती आणि निर्मिती यांचे केंद्र असल्याने ती अपवित्र समजली जाते, अशी श्रद्धाळू नागरिकांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये कथित सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केली. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (थकून जायला देव म्हणजे काही माणूस नाही. ईश्वर हे युगानुयुगे विश्व चालवणारे चिरंतर, अविनाशी तत्त्व आहे. त्यामुळे देवाला स्वतःचे रक्षण करण्याची आवश्यकताच नाही. अशाप्रकारची वक्तव्ये करणे, हा समाजाला देव आणि धर्म यांपासून दूर नेण्याचाच डाव आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्यांना कायद्यानुसार अटक करण्यात येईल किंवा दंड ठोठावला जाईल, असा अध्यादेश शासनाने काढलाच नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायला हवा. त्यांनी केवळ ‘स्टंट’ केला आहे, अशीही टीका विद्या बाळ यांनी केली. (स्वतःच प्रसिद्धीसाठी ‘स्टंट’ करणार्याळ नास्तिकवादी विद्या बाळ यांनी इतरांवर ‘स्टंट’बाजीचे आरोप करणे हास्यास्पद आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात