Menu Close

जर्मनीच्या शरणार्थी केंद्रामध्ये धर्मांधाकडून चाकूद्वारे आक्रमण करून एकाची हत्या !

‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा देत आक्रमण !

युरोपीय देशही धर्मांधांच्या कारवायांमुळे त्रस्त आहेत, हे जाणा !

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीच्या ग्रीवन येथे एका २५ वर्षीय अफगाणी वंशाच्या धर्मांधाने शरणार्थी केंद्रामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीची चाकूद्वारे वार करून हत्या केली, तसेच अन्य एका व्यक्तीला घायाळ केले. आक्रमण करतांना आरोपी ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने हे आक्रमण का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी वर्ष २०१५ मध्ये जर्मनीत आला होता आणि जानेवारी २०१८ पासून या शरणार्थी केंद्रात रहात होता. आक्रमणात ठार झालेली व्यक्ती अझरबैजानमधील होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *