हिंदुहितासाठी निःस्वार्थी भावाने लढणार्या योद्धयाचा गौरव !
राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी उल्लेखनीय कार्य करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ’संविधान के रक्षक’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हिंदु जनजागृती समिती त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे. हा पुरस्कार म्हणजे हिंदुहितासाठी निःस्वार्थी भावाने लढणार्या योद्धयाचा गौरव आहे, असे आम्ही मानतो.
आज राष्ट्र-धर्माची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे राष्ट्र-धर्मासाठी निरपेक्षपणे कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. तळमळीने कार्य करणार्यांचे असे गौरव झाल्याने अन्य अधिवक्त्यांनाही असे कार्य करण्याची स्फूर्ती मिळेल, असा विश्वास आम्हास वाटतो.
देव, देश आणि धर्म यांसाठी लढणार्यांचा असा सन्मान व्हायला हवा. यासाठी पुढाकार घेणारे हिंदु इकोसिस्टम, भाजप नेते कपिल मिश्र आणि या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणारे मा. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह जी यांचेही आभार आम्ही मानतो, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेले उल्लेखनीय कार्य :
१. अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी केलेल्या जनहित याचिकेमुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानला 900 एकर भूमी परत मिळाली आहे.
२. यासह सरकारीकरण झालेल्या मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्था, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्या 3067 मंदिरांचा घोटाळा बाहेर काढला आहे.
३. खोट्या आरोपाखाली गोवलेल्या अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे खटले ते विनामूल्य लढवत आहेत.
४. अवैध पशुवधगृह, राष्ट्रध्वजाचा अवमान, अशास्त्रीय कागदी लगद्याची गणेश मूर्ती आदी अनेक विषयांतही त्यांनी यशस्वी लढा दिला आहे.