देहलीतील कडकडडुमा न्यायालयातील घटना
-
केवळ तात्पुरता परवाना रहित करून थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबण्यासाठी बार कौन्सिलने प्रयत्न केला पाहिजे !
-
अशा प्रकारच्या घटना अन्य न्यायालयात होत आहेत का ? याची पडताळणीही आता ठिकठिकाणच्या बार कौन्सिलकडून करण्यात यायला हवी !
-
न्यायालयाच्या आवारातील चेंबरचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वी काँग्रेसचा नेता असलेल्या एका अधिवक्त्याने त्याच्या चेंबरमध्ये महिला अधिवक्त्याचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले होते. हे लक्षात घेऊन देशातील सर्वच न्यायालयांतील चेंबरचा वापर समाजविघातक गोष्टींसाठी होत नाही ना, याकडे बार कौन्सिलने लक्ष दिले पाहिजे !
नवी देहली – देहली बार कौन्सिलने कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेला अधिवक्ता इक्बाल मलिक याचा परवाना तात्पुरता रहित केला आहे. यामुळे परवाना तात्पुरता रहित असेपर्यंत तो वकिली व्यवसाय करू शकणार नाही. इक्बालवर त्याच्या चेंबरचा (न्यायालय परिसरात अधिवक्त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात आलेली लहान खोली) वापर धर्मांतर आणि विवाह करून देण्यासाठी केल्याचा आरोप आहे. (लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा धर्मांध अधिवक्ता ! लव्ह जिहादविरोधी कायदा देशभर लागू करणे का आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) ‘त्याने त्याच्या चेंबरला मशीदच बनवले होते’, असे म्हटले जात होते. येथे वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत होते. कौन्सिलने पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इक्बालचे चेंबर सील करण्याचाही आदेश दिला होता. कौन्सिलने इक्बाल याला ७ दिवसांच्या आत कौन्सिलच्या शिस्तपालन समितीकडे याविषयी उत्तर देण्यास सांगितले आहे. ‘जर या काळात त्याने उत्तर दिले नाही, तर योग्य कारवाई करण्यात येईल’, असेही म्हटले आहे.
उक्त वकील धर्मांतरण कराने वाला एक ट्रस्ट भी चलाता है, ऐसा BCD ने पाया है। इसका संचालन भी उसी चैंबर से किया जाता था। निकाह कराने वाले काजी का नाम मोहम्मद अकबर देहलवी है।https://t.co/xZkDUqqWOf
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 6, 2021