Menu Close

वळपाई (गोवा) शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती : सामाजिक माध्यमांतून रोष व्यक्त !

विविध ठिकाणी घुसखोरी करणे आणि आपले संख्याबळ वाढवणे, आधी वाड्यांना आणि मग गावांना इस्लामी नावे देणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र असते. हिंदू हे जाणून सावध होतील, तो सुदिन !

वळपाई – काही वर्षांपूर्वी शहरात एका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास विरोध झाल्यामुळे येथील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे शक्य झाले नव्हते; मात्र याच परिसरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती झाली आहे. याविषयी येथील एका आस्थापनाचा ‘इस्लामपूर’ असा पत्ता असलेले चित्र सामाजिक माध्यमांत फिरत आहे, तसेच या भागातील काही पत्ते ‘गूगल’वर शोधल्यास पत्त्यामध्ये ‘इस्लामपूर’ नावाचा उल्लेख आढळून येतो. हा प्रकार प्रथम सार्वजनिक स्तरावर उघड झाल्याने नागरिकांकडून सामाजिक माध्यमांतून रोष व्यक्त केला जात आहे. (केवळ रोष व्यक्त करून काही उपयोग होणार नाही. संघटितपणे संबंधितांना खडसावून हा पत्ता पालटायला लावायला हवा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

सामाजिक माध्यमांत ‘नॅशनल ट्रेडींग कंपनी’चा ‘इस्लामपूर, हातवाडा, वन खात्याच्या कार्यालयाजवळ, वाळपई’, हा पत्ता असलेला फलक सध्या सामाजिक माध्यमांत फिरत आहे. या विषयावरून सामाजिक माध्यमांतून प्रतिक्रियांद्वारे पुढील सूर उमटत आहे. ‘‘वाळपई येथे हिंदू आणि मुसलमान एकजुटीने रहातात; मात्र परप्रांतीय मुसलमांनांची संख्या वाळपई शहरात वाढत आहे. वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ची निर्मिती म्हणजे मतपेढीचे राजकारण आहे.’’

सूज्ञ नागरिकांचे विविध प्रश्न !

१. वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती करतांना त्या वाड्यावर रहाणार्‍या हिंदूंना विश्वासात घेतले होते का ?

२. ‘इस्लामपूर’ असे नामकरण कोणत्या कायद्याने केले ?

३. ‘इस्लामपूर’ असा नामकरण करणारा ठराव वाळपई नगरपालिकेने कधी घेतला ?

४. वाळपई येथे चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास वाळपई नगरपालिकेने त्या वेळी विरोध का केला ?

५. स्थानिक आमदार या ठिकाणी धर्माच्या आधारावर लोकांमध्ये भेद निर्माण करत आहेत का ?

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *