Menu Close

सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे स्मार्टफोन हाताळल्यास कर्करोग होण्याची ६० टक्के शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष

विज्ञानाने कितीही नवनवीन शोध लावले आणि ‘त्याचा मनुष्याला लाभ होत आहे’, असे म्हटले, तरी प्रत्यक्षात ते अपायकारकच ठरत आहे, हेच समोर येत आहे, हे लक्षात घ्या !

अमेरिका, आंतरराष्ट्रीय, आरोग्य, रोग, संशोधन

कॅलिफोर्निया (अमेरिका) – अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, स्मार्टफोनचा वापर सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे केल्यास कर्करोग होण्याचा धोका ६० टक्क्यांनी वाढतो. हा दावा भ्रमणभाष आणि मनुष्य यांच्या विषयीच्या ४६ प्रकारच्या संशोधनातून करण्यात आला आहे. क्ष-किरणांचा शरिरावर होणार्‍या परिणामांविषयीचे संशोधन करण्यासाठी देण्यात येत असलेले आर्थिक साहाय्य अमेरिकेच्या शासनाने वर्ष १९९० मध्येच बंद केले होते. त्यामुळे त्यानंतर यावर अधिक संशोधन होऊ शकले नव्हते. आता पुन्हा याविषयावर संशोधन चालू करण्यात आले आहे.

१. संशोधन करणार्‍या कॅलिफोर्निया विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, ‘भ्रमणभाषमधून निघणार्‍या ‘सिग्नल’मुळे व्यक्तीच्या ‘डी.एन्.ए.’ची (गुणसूत्रांची) रचना पालटते. यामुळे मृत्यूही होऊ शकतो.’ दुसरीकडे अमेरिकेतील ‘फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने मात्र ‘भ्रमणभाषमधून निघणार्‍या क्ष-किरणांचा आरोग्यावर परिणाम होतो’, हे नाकारले आहे.

२. कॅलिफोर्निया विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी अमेरिका, स्विडन, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड येथे हे संशोधन केले. वर्ष २०२०मध्ये जगभरातील ९५ टक्के घरांमध्ये निदान एकतरी भ्रमणभाष संच असतो. लोकांनी भ्रमणभाषचा वापर अल्प करून लँडलाईनचा वापर केले पाहिजे. भ्रमणभाषला शरिरापासून दूर ठेवले पाहिजे. वायरलेस (बिनतारी) यंत्र क्ष-किरण उर्जेला अधिक गतीमान बनवत असते. त्याचा शरिरावर दुष्परिणाम होत असतो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *