Menu Close

(म्हणे) ‘अल्ला प्रत्येकाला जन्माला घालतो आणि त्याचे पोषण करतो !’

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा उत्तरप्रदेशातील लोकसंख्या नियंत्रण कायद्याला विरोध

  • असे जरी म्हटले, तरी आपण किती जणांचे पोषण करू शकतो, याचा विचार बर्क आणि त्यांचे धर्मबांधव का करीत नाहीत ? स्वतःच्या मुलांचे पोषण न करता वर सरकारकडे ‘अल्पसंख्य’ म्हणून सुविधा का मागितली जाते ? देशाच्या संपत्तीतील मोठा वाटा सुविधांद्वारे घेऊनही वर देशविरोधी कारवायांमध्ये कोण पुढे असतात, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे !

  • चीनमध्ये गेली अनेक वर्षे एकच मूल जन्माला घालण्याचा कायदा होता. त्या वेळी तेथील मुसलमानांनी त्याला का विरोध केला नाही आणि त्यांच्याबाजूने जगातील मुसलमान का बोलत नव्हते ? आजही चीनमध्ये उघूर मुसलमानांवर जो काही अत्याचार केला जात आहे, त्याविषयी बर्क आणि त्यांचा पक्ष तोंड का उघडत नाहीत ?

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी राज्यातील भाजप सरकारकडून लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याच्या प्रक्रियेवर टीका केली आहे. ‘अल्ला प्रत्येकाला जन्माला घालतो आणि त्याचे पालनपोषण करतो. व्यक्ती  गरीब असो कि श्रीमंत तिचे पोषण होतेच. त्याला विरोध करणे योग्य नाही. यामुळे हानी होईल. हा जनतेच्या हिताचा कायदा नाही’, अशी बिनबुडाची टीका बर्क यांनी केली आहे.

खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी कायद्याच्या विरोधात मांडलेली सूत्रे

१. जर लोकसंख्या अल्प झाली आणि अशा वेळी शत्रूराष्ट्राने भारतावर आक्रमण केले, तेव्हा काय करणार ? (भारतावर आक्रमण केल्यावर त्याच्या विरोधात बहुसंख्य हिंदूच लढतात. याउलट देशद्रोही कारवाया कोण करतात, हेही भारतियांना ठाऊक आहे. त्यामुळे आक्रमणाची चिंता बर्क यांनी करू नये ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. भाजपने जनतेला काहीही दिलेले नाही. आता या कायद्याद्वारे जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

३. समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा यावर चर्चा करू. आता काही भाष्य केले जाऊ शकत नाही.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *