Menu Close

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !

  • १५ ऑगस्टला बॉम्बस्फोट घडवण्याचा कट

  • स्फोटके, प्रेशर कुकर बॉम्ब, पिस्तुल जप्त.योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे काही नेते होते लक्ष्य !

आता अशा आतंकवाद्यांना कारागृहात ठेवून आजन्म पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !

अल् कायदा आतंकवादी मसरुद्दिन आणि मिनाज

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथील काकोरी पोलीस ठाण्याच्या सीमेत असलेल्या दुबग्गा परिसरातील एका घरावर धाड टाकून अल् कायदाशी संबंधित (अल् कायदा म्हणजे ‘पाया’ किंवा ‘आधार’) ‘अंसार गजवत-उल-हिंद’ (भारताचा विनाश) या आतंकवादी संघटनेच्या मिनाज आणि मसरुद्दीन या दोघा आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईपूर्वीच येथून ५ आतंकवादी पळून गेल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे या कारवाईच्या वेळी राज्यातील रायबरेली, हरदोई, उन्नाव आणि सीतामढी येथे अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. हे आतंकवादी भाजपच्या मोठ्या नेत्यांना लक्ष्य करणार होते, असे सांगितले जात आहे. लक्ष्य करण्यात येणार्‍या नेत्यांच्या सूचीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि सुनील बन्सल या नावांचा समावेश आहे. पथकाकडून येथे शोधमोहीम चालू आहे. त्यांच्या समवेत स्थानिक पोलीसही आहेत. या परिसरातील ५०० मीटर अंतरावरील काही घरे रिकामी करण्यात आली असून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, तसेच श्वान पथक यांद्वारे शोध घेतला जात आहे. हा परिसर सील करण्यात आला आहे.

१. हे आतंकवादी बाजारपेठ असलेल्या गजबजलेल्या शहरांत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. यांचे अन्य साथीदार कानपूर, तसेच लक्ष्मणपुरीत अन्य ठिकाणीही आहेत. गुप्तचर विभाग आणि अन्य गुप्तचर यंत्रणाही या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

२. या आतंकवाद्यांना अमर अल् मंडी या आतंकवाद्याने प्रशिक्षण दिले होते. शाहिद नावाच्या व्यक्तीच्या घरात ते लपून कट रचत होते. याविषयी आतंकवादविरोधी पथकाला एक आठवड्यापूर्वी माहिती मिळाली असल्याने या घरावर त्यांचे लक्ष होते.

टेलीग्रामद्वारे पाकमधील ‘हँडलर’शी करत होते संपर्क !

आतंकवादविरोधी पथकाकडून शाहिद, सिराज आणि रियाज या तिघांच्या घरात धाड घालण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शाहिद ५ वर्षे सौदी अरेबियामध्ये राहिला होता. तो सध्या टेलीग्रामद्वारे अल् कायदा आणि पाकिस्तानच्या पेशावर येथील ‘हँडलर’ (या आतंकवाद्यांना निर्देश देणारा आतंकवादी) असलेल्या उमर अल् मंडी याच्या संपर्कात होता. त्याच्या घरातून स्फोटके, २ प्रेशर कुकर बॉम्ब आणि एक विदेशी पिस्तुल जप्त करण्यात आली. तसेच काही कागदपत्रे घरात जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *