एक पोलीस घायाळ, तर एका गाडीची हानी !
पोलीस ठाण्यासह स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस काय कामाचे ? उद्या २-३ आतंकवाद्यांनी सशस्त्र आक्रमण केले, तर पोलीस जिवंत तरी राहू शकतील का ? अशांना देण्यात येणारे प्रशिक्षण किती कुचकामी आहे, हेच लक्षात येते !
कलोल (गुजरात) – येथे ८ जुलै या दिवशी पोलिसांना गोमांस भरलेली एक चारचाकी गाडी सापडली होती. इम्रान पावडा आणि फारूख पावडा हे दोघे ही गाडी नेत होते. पोलिसांना पाहून ते गाडी सोडून पळून गेले. पोलिसांनी ही गाडी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर काही वेळाने इम्रान आणि फारूख यांनी धर्मांधांच्या जमावाला घेऊन पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. यात एक पोलीस घायाळ झाला, तर पोलिसांच्या एका गाडीची हानी झाली. या वेळी धर्मांधांनी गोमांस असलेली गाडी घेऊन पलायन केले.
Gujarat: Communal clashes erupt in Panchmahal as mob of cow beef smugglers, aides attack police, pelt stones https://t.co/aMLxET1V58
— OpIndia.com (@OpIndia_com) July 11, 2021