Menu Close

हिंदु नाव धारण करून धर्मांधाकडून हिंदु युवतीचे बलपूर्वक धर्मांतर !

धर्मांधाने भाऊ आणि वडील यांनाही करायला लावले हिंदु युवतीचे शोषण !

  • लव्ह जिहादच्या शेकडो घटना घडून सहस्रो हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतांनाही सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा का करत नाही ?

  • सरकारने लव्ह जिहादकडे केवळ गुन्हा म्हणून न बघता ‘हिंदु धर्माविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे’, या दृष्टीने पहावे आणि त्यानुसार कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

  • हिंदूंवरील या अन्यायाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी एकमुखाने आवाज उठवावा !

प्रतिकात्मक छायाचित्र

बदायूँ (उत्तरप्रदेश) – दानिश नावाच्या धर्मांध तरुणाने दिनेश हे हिंदु नाव धारण करून बुलंदशहर येथील एका हिंदु युवतीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी निकाह केला. या प्रकरणी पोलिसांनी दानिश आणि त्याचे वडील अहमदमियाँ यांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध चालू आहे.

दानिश हा देहलीत काम करत होता. वर्षभरापूर्वी सदर युवतीशी त्याची ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. यास युवतीने विरोध केला असता दानिशने तिला मारहाण केली. त्याने तिला उत्तरप्रदेशमधील गौरामई या त्याच्या मूळ गावी नेले. तिने निकाहाला विरोध केल्यानंतर दानिशने त्याचा भाऊ चाहतमियाँ आणि त्याचे वडील अहमदमियाँ यांना तिचे शोषण करायला लावले. १२ जून या दिवशी संधी मिळताच युवती दानिशच्या घरातून पळून तिच्या बहीणीच्या घरी गेली आणि तिने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *