Menu Close

सैन्याची गोपनीय माहिती पाकला पुरवल्याच्या प्रकरणी पोखरण (राजस्थान) येथील सैन्यतळाला भाजी पुरवणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा संवेदनशील ठिकाणी धर्मांधांना प्रवेश देण्यात येऊ नये, असेच या घटनेवरून लक्षात येते ! सैन्याने आतातरी आत्मघातकी सर्वधर्मसमभाव बाजूला ठेवावा !

देशद्रोह करणार्‍यांवर तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

हबीबुर्रहमान खान

पोखरण (राजस्थान) – येथे सैन्यतळाला भाजी पुवणार्‍या हबीबुर्रहमान खान या ३४ वर्षीय व्यक्तीला हेरगिरी केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी अटक केली. हबीब खान पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पुरवत होता. त्याच्याकडून अत्यंत गोपनीय कागदपत्रे आणि सैन्यतळाचे रेखाचित्र जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आगरा येथे तैनात असलेल्या परमजित कौर या सैनिकाने हबीब याला ही कागदपत्रे मिळवून दिल्याचे समोर आले आहे. हबीब ही माहिती कमल नावाच्या व्यक्तीकडे पाठवत होता. हबीबुर्रहमान पाकिस्तानलाही जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. (हबीबुर्रहमान पाकला जाऊन आला असतांनाही त्याला सैन्यतळासारख्या संवेदनशील ठिकाणी भाजी पुरवण्याचे कंत्राट कसे मिळाले ? याचीही चौकशी झाली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) हबीब खान याची चौकशी चालू असून त्यातून आणखीही काही संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे.

हबीबुर्रहमान खान हा बिकानेरचा रहिवासी असून तो काही सामाजिक कार्यांतही सहभागी असतो. तो गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटदार म्हणूनही काम करत आहे.  पोखरणमध्ये सैन्यतळाच्या ‘इंदिरा किचन’ला भाजी पुरवण्याच्या कामाचे कंत्राट त्याला मिळाले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *