मंगळुरू (कर्नाटक) येथील कटीलु श्री दुर्गापरमेश्वरी देवीचा अश्लील शब्दांत अवमान केल्याचे प्रकरण
पोलिसांनी पकडले नसते, तर फर्नांडिस याने मंदिरात येऊन क्षमायाचना केली असती का ? अशांना केवळ क्षमेवर सोडून न देता त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
मंगळुरू (कर्नाटक) – येथे काही दिवसांपासून कटिलु श्री दुर्गापरमेश्वरी देवीविषयी ध्वनीसंदेशाद्वारे (‘व्हॉईस मेसेज’द्वारे) अश्लील शब्दांचा उपयोग करून अवमान करणार्या आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याने मंदिरात येऊन क्षमायाचना केल्याची घटना घडली आहे.
बज्पे (कर्नाटक) येथील निवासी अल्बर्ट फर्नांडिस हा मुंबई येथे काम करत असून काही दिवसांपूर्वी त्याने दिनेश नावाच्या हिंदूला कटिलु श्री दुर्गापरमेश्वरी देवीची निंदा करणारा ध्वनी संदेश पाठवला होता. तो संदेश ऐकून हिंदु संघटनांनी बज्पे पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे पोलीस अल्बर्ट फर्नांडिस याला मुंबईतून पकडून मंगळुरू येथे घेऊन आले. फर्नांडिस याने कटीलु देवस्थानात येऊन श्री दुर्गापरमेश्वरी देवीसमोर ‘मी चूक केली आहे. असे करायला नको होते. मी अपराध केला आहे’, असे म्हणून डोळ्यांत पाणी आणून क्षमायाचना केली. त्यानंतर तक्रार करणार्या हिंदु संघटनांच्या प्रमुखांनी बज्पे पोलीस ठाण्यात एकत्र जमून प्रकरण मिटवले.