बल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांची मागणी
बल्लभगड (हरियाणा) : रामजन्मभूमीमध्ये श्रीरामाचे मंदिर असल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे हिंदूंना तेथे पूजाअर्चा करण्याची अनुमती मिळावी, तसेच केवळ अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी कर्नाटक शासनाने अंदाजपत्रकामध्ये केलेली जादा तरतूद रहित करावी, या मागण्यांसाठी येथील सिटी पार्क येथे २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये राजीव दीक्षित स्वदेशी रक्षा मंचाचे श्री. प्रवीण गुप्ता, गोमानव सेवा ट्रस्टचे श्री. बालकिशन ठाकूर, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. भूपेश शर्मा, सर्वश्री अभय किंगर, अरविंद गुप्ता, सुरेश मुंजाल, सौ. संदीप कौर, तसेच वैदिक उपासना पिठाच्या पू. तनुजा ठाकूर, सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी, पूनम किंगर, राहुल यांनी आंदोलकांना संबोधित केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात