Menu Close

अनधिकृतपणे आणि बळजोरीने धर्मांतर घडवून आणणार्‍या तिघांना अटक !

उत्तरप्रदेशातील आतंकवादविरोधी पथकाची नागपूर येथे कारवाई

असा प्रकार करणार्‍या आरोपींना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत धर्मांतराच्या प्रकारांना आळा बसणार नाही !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – अनधिकृतपणे आणि बळजोरीने धर्मांतर घडवून आणणार्‍या एका टोळीतील तिघांना उत्तरप्रदेश राज्यातील आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) येथील गणेशपेठ बसस्थानक परिसरात अटक केली. प्रसाद कांबळे (नागपूर), कौसर शोकत अली खान (झारखंड) आणि भूप्रियबंडो मानकर (चार्मोशी, गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

१. उत्तरप्रदेश येथील आतंकवादविरोधी पथकाने २२ जून या दिवशी धर्मांतर करणारी टोळी उघडकीस आणली होती.

२. या प्रकरणात धर्मांतरविरोधी कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी महाराष्ट्र, केरळ, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि देहली या राज्यांतील विविध भागांत लपून बसल्याची माहिती आतंकवादविरोधी पथकाला मिळाली.

३. आरोपी वेगवेगळ्या धर्मांचे असून त्यांनी ‘इस्लाम’ पंथ स्वीकारला आहे. तेव्हापासून ते बळजोरीने गरीब आणि मूकबधीर लोकांचे धर्मांतर घडवून आणायचे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *