Menu Close

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नसल्याचे भासवणारा आणि हिंदूंना मुसलमानद्वेषी दाखवणारा ‘तुफान’ चित्रपट प्रदर्शित !

  • ‘तुफान’सारखे चित्रपट बनवणे हे ‘लव्ह जिहाद’च्या कारवाया करणार्‍यांचे षड्यंत्रच आहे ! यातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हिंदुविरोधी साखळी कशी कार्यरत आहे, हे लक्षात येते ! अशा चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा !

  • वर्ष १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे’ या चित्रपटामध्ये हिंदु नायक आणि मुसलमान नायिका यांच्या प्रेमकथेला धर्मांधांनी प्रचंड विरोध केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक मणीरत्नम् यांच्या घरावर धर्मांधांनी आक्रमणही केले होते. जर धर्मांध एका हिंदु नायकाचे मुसलमान नायिकेशी दाखवण्यात आलेले प्रेम चित्रपटातही सहन करू शकत नसतील, तर प्रत्यक्षपणे चालू असलेला ‘लव्ह जिहाद’ आणि वर त्याला खतपाणी घालणारे असे चित्रपट हिदूंनी का सहन करावेत ?

  • ‘लव्ह जिहाद’मुळे आज सहस्रो हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतांना तो अस्तित्वात नसल्याचे दाखवून हिंदूंनाच मुसलमानद्वेषी ठरवणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नव्हे का ?

मुंबई – निर्माते फरहान अख्तर यांचा ‘तुफान’ हा चित्रपट १६ जुलै या दिवशी ‘ॲमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला. यामध्ये अनन्या प्रभु (अभिनेत्री) नावाची हिंदु ब्राह्मण आधुनिक वैद्य असणारी मुलगी अझीझ अली (अभिनेता) नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते. मुलीचे वडील (नाना प्रभु) हा ‘लव्ह जिहाद’ असल्याचे सांगत त्यांच्या विवाहाला विरोध करतात. शेवटी वडिलांना स्वत:ची चूक लक्षात येते आणि ते अझीझ अली याची क्षमा मागतात’, असे यात दाखवण्यात आले आहे. खरे तर चित्रपटाचे कथानक ‘बॉक्सिंग’वर आधारित आहे. तरीही या चित्रपटात वरील कथा जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्याचे दिसून येते. या चित्रपटातील अनेक संवाद हिंदूंना मुसलमानद्वेषी दाखवणारे आहेत.

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारे आणि हिंदूंना मुसलमानद्वेषी दाखवणारे चित्रपटातील काही प्रसंग

१. मुंबईतील डोंगरी भागातील आधुनिक वैद्य असणारी हिंदु अभिनेत्री गुंडगिरी करणार्‍या मुसलमान अभिनेत्याला ‘बॉक्सिंग’ शिकण्यासाठी प्रेरित करते. वडिलांनी तिच्या विवाहासाठी आणलेल्या एका आधुनिक वैद्य मुलाचे स्थळ ती नाकारते.

स्थळ आणलेल्या मुलाची वडिल नसल्याचे वडिलांनी सांगितल्यावर ‘वडिलांनी त्या मुलाच्या आईशी विवाह केला, तर मला डॉक्टर भाऊ मिळेल’, असा विनोद अभिनेत्री करते. यामध्ये हिंदु मुलांना भाऊ मानायला सिद्ध असलेली उच्चशिक्षित नायिका एका मुसलमान गुंड मुलाकडे मात्र आकर्षित होते, असे दाखवण्यात आले आहे.

२. अभिनेत्रीचे वडील ‘बॉक्सिंग’चे प्रशिक्षण देणारे मुंबईतील सर्वश्रेष्ठ प्रशिक्षक असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुंबईतील एका बॉम्बस्फोटात त्यांच्या पत्नीचा मृत्यू होतो. त्यामुळे ते सर्व मुसलमानांना आतंकवादी समजत असल्याचे, तसेच इस्लामला जिहादी मानत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांचे विचार आक्रमकपणे मांडतांना ते मुसलमानद्वेषी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

३. ते ज्या मुसलमान अभिनेत्याला प्रशिक्षण देत असतात, तो प्रेम करत असलेली मुलगी हिंदु असल्याचे समजताच ते त्याच्याकडे संशयाने पहातात. त्याच्यावर प्रेम करणारी मुलगी स्वत:चीच आहे, हे समजताच ते त्याला शिवीगाळ करत त्याच्या कानशिलात लगावतात, तसेच अपमानास्पद बोलून त्याला घरातून हाकलून देतात. या प्रसंगात अभिनेत्रीचे वडील मुसलमानांना तुच्छ लेखत असल्याचे दर्शवण्यात आले आहे; त्याच वेळी मुसलमान अभिनेता मात्र संयमी आणि विनम्र दाखवण्यात आला आहे.

४. यानंतर अभिनेत्री वडिलांचा विरोध पत्करून तात्काळ घर सोडून मुसलमान प्रियकराच्या घरी जाऊन त्याच्यासमवेत रहाते. या वेळी तिचे वडील तिला हा ‘लव्ह जिहाद’ असल्याचे सांगतात. ‘तो नंतर आणखी ३ लग्न करील. सर्व मुसलमान एकसारखेच असतात’, असे समजवण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांना ती जुमानत नाही.

५. या वेळी मोहल्ल्यातील मुसलमान तिचे मुसलमान नाव ठेवण्यास, तसेच तिला कलमा वाचण्यास सांगतात; मात्र मुसलमान प्रियकर त्यांना ठाम विरोध करतो. हिंदु धर्माचा आदर करत तिला हिंदु धर्मानुसार वागण्याची मुभा देतो. ती त्याच्यासाठी घरदार सोडून आल्याचे सांगत तो तिच्यासाठी मोहल्ला सोडून दुसरीकडे रहायला जातो.

६. या वेळी तो मुसलमान असल्यामुळे ‘हिंदु वस्तीमध्ये त्याला सदनिका देत नाहीत’, असे दाखवण्यात आले आहे.

७. बॉक्सिंगचा सराव करतांना प्रशिक्षक असलेले अभिनेत्रीचे वडील ‘जय हनुमान’ म्हणतात, त्या वेळी हा मुसलमान अभिनेताही ‘जय हनुमान’ म्हणतो. या वेळी मुसलमान नायक हिंदूंच्या देवतांचा आदर करणारा; मात्र प्रशिक्षक असलेले वडील संपूर्ण चित्रपटात मुसलमानांचा द्वेष करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

८. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्यापासून झालेल्या मुलीवर हिंदु धर्मानुसार संस्कार करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. मुलगी श्री गणेशाच्या मंदिरात आरती म्हणतांना आणि पूजाअर्चा करतांना दाखवली आहे.

९. चित्रपटाच्या शेवटी ‘लव्ह जिहाद’ म्हणून विरोध करणार्‍या हिंदु अभिनेत्रीच्या वडिलांना त्यांच्या कृत्याविषयी पश्चात्ताप होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ते मुसलमान नायकाची क्षमा मागतात.

१०. एकूणच या चित्रपटामध्ये ‘मुसलमान युवक हिंदु युवतीवर कसे जिवापाड प्रेम करतो, तिच्या हिंदु धर्माचा आदर करतो आणि तिच्याशी एकनिष्ठ रहातो, अशा अवास्तवादी गोष्टी दाखवून ‘लव्ह जिहाद’ म्हणजे भ्रामक कल्पना आहे ’, असे दर्शवण्यात आले आहे. (‘या चित्रपटात मुसलमान अभिनेता हिंदु मुलीशी शेवटपर्यंत एकनिष्ठ रहातो’, असे दाखवण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र ‘मुसलमान अभिनेत्यांनी विवाह केलेल्या हिंदु नायिकांना घटस्फोट देऊन अनेक विवाह केले आहेत’, अशी अनेक उदाहरणे आहेत. याची मोठी सूची सिद्ध होईल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *