सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन
सोलापूर – भारतावर परकियांनी ५०० वर्षे आक्रमणे केली. त्यानंतर इंग्रजांनी वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर हिंदूंच्या हातातील शस्त्रे काढली. अहिंसेच्या नावाखाली गांधीवादी तत्त्वांनी भारतियांच्या मनातून शौर्ययुक्त शस्त्र काढून घेतले आणि बहुसंख्यांक हिंदूंचे खच्चीकरण करून त्यांची फसवणूक केली. त्यामुळे हिंदूंना स्वतःतील शौर्याचा विसर पडला आहे. सध्या देश आणि धर्म यांच्यावर होत असलेले आघात रोखण्यासाठी हिंदूंनी क्रांतीकारकांचा आदर्श घेऊन सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाच्या वेळी केले.
या व्याख्यानामध्ये बीड, बारामती, धाराशिव, सोलापूर, अकलूज येथील अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा ढगे यांनी केले, तर उद्देश श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी सांगितला.
अभिप्राय
१. श्री. संदीप कणसे – लहानपणापासून देश आणि धर्म यांची सेवा करण्याची इच्छा होती. आता ती सेवा करण्याचा प्रयत्न करीन.
२. श्री. व्यंकटेश यंगल – स्वरक्षणासाठी आत्मबळ आणि मनोबळ कसे वाढवायचे हे समजले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात