Menu Close

राजस्थानमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदाराच्या उपस्थितीत मीणा समाजाच्या युवकांनी फाडला श्रीराम लिहिलेला भगवा ध्वज !

हिंदुद्वेषी काँग्रेस सत्तेवर असलेल्या राजस्थानमध्ये भगवा ध्वज फाडला जाणे यात आश्‍चर्य ते काय ? अशांना निवडून देणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !

जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या आमागड किल्ल्यामध्ये श्रीराम लिहिण्यात आलेला भगवा ध्वज काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार रामकेश मीणा यांच्या उपस्थितीत मीणा समाजातील काही तरुणांनी फाडून फेकून दिला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

१. आमदार आणि राजस्थान आदिवासी मीणा सेवा संघाचे अध्यक्ष रामकेश मीणा यांनी या घटनेविषयी सांगितले की, आमागड किल्ला हा मीणा समाजाचा ऐतिहासिक वारसा आहे. येथे मीणा समाजाचे शासन होते. येथे अंबामातेचे मंदिर आहे. काही समाजकंटकांनी येथे भगवा ध्वज फडकावून मीणा समाजाच्या इतिहासाशी छेडछाड केली. (मीणा समाज हा विष्णूच्या मत्स्यावतारापासून उत्पन्न झाला आहे, अशी नोंद आहे. श्रीराम हा तर विष्णूचा अवतार. श्रीरामाचे चित्र असलेला भगवा ध्वज फडकावणे, यात चूक ते काय ? यामुळे इतिहासाशी छेडछाड कशी काय झाली ? स्वतःची हिंदु पाळे-मुळे विसरून अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे नतद्रष्टच होत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) यामुळेच हा ध्वज येथून काढून टाकण्यात आला. अशी घटना पुन्हा होऊ नये; म्हणून या किल्ल्याकडे लक्ष ठेवण्यासाठी आमच्या संघाच्या येथील शाखेकडे दायित्व सोपवण्यात आले आहे. (स्वतःचे वेगळे अस्तित्व जपण्यासाठी हिंदु धर्मापासून फारकत घेणारे हिंदू ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांनी काही जणांना अटकही केली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *