कुठे इस्लामचा अवमान करणार्यांवर तात्काळ कारवाई करून शिक्षा ठोठवणारा बांगलादेश, तर कुठे हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल न करणारा भारत !
ढाका : इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपांतर्गत बांगलादेशमधील २ हिंदु शिक्षकांना येथील न्यायालयाने २७ एप्रिलला कारावासाची शिक्षा ठोठावली.
१. बगेरहाट जिल्ह्यातील हिजला उच्च माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विज्ञान शिकवणार्या या हिंदु शिक्षकांनी कुराणात सांगितल्याप्रमाणे स्वर्ग नसतो, असे सांगितल्याचा आरोप केला होता.
२. यामुळे मुसलमान विद्यार्थी, पालक आणि गावकरी यांचा समावेश असलेल्या संतप्त जमावाने या शिक्षकांना हॉकी स्टिक्सच्या साहाय्याने मारहाण केली आणि त्यांना खोलीमध्ये कोंडून ठेवले. पोलिसांनी या शिक्षकांची सुटका केली.
३. इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांतर्गत विज्ञानाचे संबंधित शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात