Menu Close

स्वतःवर ‘ब्रेन ट्युमर’ची शस्त्रक्रिया होत असतांना युवती म्हणत होती श्री हनुमान चालिसा !

तब्बल ३ घंटे चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी

धर्म, अध्यात्म, साधना, उपासना आदी सर्व खोटे असल्याची ओरड करणारे नास्तिकतावादी, तथाकथित विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आदींना सणसणीत चपराक !

‘ब्रेन ट्युमर’ची शस्त्रक्रिया झालेली २४ वर्षीय युवती

नवी देहली – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (‘एम्स’मध्ये) स्वतःवर ‘ब्रेन ट्युमर’ची शस्त्रक्रिया चालू असतांना एक २४ वर्षीय युवती श्री हनुमान चालिसा म्हणत असल्याची माहिती ही शस्त्रक्रिया करणार्‍या पथकातील आधुनिक वैद्य (डॉक्टर) दीपक गुप्ता यांनी दिली. रुग्णालयाच्या अग्रगण्य आधुनिक वैद्यांच्या पथकाने तिची ‘न्यूरो सर्जरी’ केली. तब्बल ३ घंटे चाललेल्या या शस्त्रक्रियेच्या वेळी ही युवती जागरूक होती. तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

डॉ. दीपक गुप्ता यांनी सांगितले की, ही युवती देहलीच्या शाहदरा परिसरातील रहिवासी आहे. या मुलीच्या डोक्याच्या अनेक भागांत ‘ट्युमर’ होते. यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रथम तिच्या डोक्याच्या वरच्या भागात भूल देण्याची ‘इंजेक्शन्स’ देण्यात आले, तसेच वेदनाशामक औषधेही दिली गेली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी तिच्या डोक्यात असलेल्या मज्जातंतू वेगवेगळ्या रंगांनी चिन्हांकित (कोडिंग) केल्या गेल्या, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘ट्रॅक्टोग्राफी’ असे म्हणतात. या प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे मेंदूची न्यूनतम हानी होते. यासह मेंदूतील महत्त्वपूर्ण भाग खराब होऊ नयेत, यासाठी रुग्णाला जागरूक ठेवले जाते.’’ ते पुढे म्हणाले की,  हनुमान चालीसा किंवा इतर कोणत्याही धार्मिक उपासना केल्यास अनेक लाभ होतात.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *