आतापर्यंत जगात वासनांध पाद्य्रांच्या कारवाया समोर येत होत्या. आता द्वेषमूलक आणि अश्लाघ्य विधाने करणारेही पाद्री आहेत, हेही समोर येत आहे. याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलतील का ?
कन्याकुमारी (तमिळनाडू) – पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेते यांच्या विरोधात द्वेषपूर्ण आणि आकस निर्माण करणारी विधाने केल्यावरून रोमन कॅथोलिक पाद्री जॉर्ज पोन्नैया याला येथील पोलिसांनी अटक केली. पोन्नैया ‘जनन्याग क्रिस्थुवा पेरवई अमाईपु’ नावाच्या संस्थेचा सल्लागारही आहे. त्याने कन्याकुमारीमधील अरुमनई येथे एका सभेत बोलतांना हिंदुविरोधी विधानेही केली होती. त्याच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यापूर्वी त्याने त्याच्या विधानाविषयी क्षमा मागण्याचाही प्रयत्न केला होता. काही मासांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्याने द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचा प्रसारही केला होता.
Catholic priest in Tamil Nadu arrested for hate speech against Hindus: Here is what the pastor saidhttps://t.co/mEVYICAeVs
— OpIndia.com (@OpIndia_com) July 24, 2021
जॉर्ज पोन्नैया याने केलेली आक्षेपार्ह विधाने
१. नरेंद्र मोदी यांचा शेवटचा दिवस दयनीय असेल, हे मी लिहून देतो. आम्ही ज्या देवाला पुजतो तो खरेच जिवंत असेल, तर इतिहास पाहील की, मोदी आणि अमित शहा यांचे सडलेले शरीर कुत्रे आणि कीडे खातील.
२. राज्यातील नागरकोली येथील भाजपचे आमदार एम्.आर्. गांधी यांना उद्देशून पोन्नैया म्हणाला होता की, भारत मातेला दुःख होऊ नये; म्हणून गांधी चपला घालत नाहीत. आम्ही मात्र भारतामातेमुळे आम्हाला कोणताही आजार होऊ नये आणि आमच्या पायाला घाण लागू नये म्हणून चपला घालतो.
३. विधानसभा निवडणुकीत द्रमुकला (‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ला) मिळालेला विजय म्हणजे ख्रिस्ती आणि मुसलमान यांनी दिलेली भीक आहे.
(टीप : पाद्री पोन्नैया यांची ही विधाने कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही, तर माहितीसाठी प्रसिद्ध करत आहोत.)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात