Menu Close

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

मुंबई – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत सनातनच्या विविध भाषिक ग्रंथांचे सनातनच्या संतांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

‘धर्मकार्य हेतु विज्ञापन आदि अर्पण प्राप्त करना समष्टि साधना है !’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन करतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

‘कल्टिवेटिंग मेडिसिनल प्लांट्स ॲस पर द स्पेस अवेलेबल’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन करतांना पू. अशोक पात्रीकर

यामुळे आतापर्यंत सनातनचे हिंदी भाषेतील एकूण १८३ ग्रंथ, कन्नड भाषेतील एकूण १८१ ग्रंथ, तर इंग्रजी भाषेतील एकूण २०४ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. ग्रंथ प्रकाशनाचे विवरण येथे देत आहोत.

वरील ग्रंथांच्या प्रकाशनासमवेतच जिज्ञासूंना सनातनच्या अन्यही काही नूतन ग्रंथांची माहिती देण्यात आली. यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अभ्यासवर्ग यांच्याशी संबंधित ग्रंथ, तसेच आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळ यांच्यापासून रक्षण होण्यासाठीचे उपाय, आयुर्वेदातील औषधी आदी विषयांवरील मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील ग्रंथांचा समावेश होता.

सनातनचे ग्रंथ आता ‘ई-बूक’ स्वरूपातही उपलब्ध !

‘त्योहार मनाने की उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या हिंदी भाषेतील पहिल्या ‘ई-बूक’चे प्रकाशन करतांना पू. पृथ्वीराज हजारे

सनातन संस्थेचे ग्रंथ आता ‘ई-बूक’ (ई-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर होय. इंटरनेटला जोडलेल्या संगणकाच्या किंवा ‘स्मार्टफोन’च्या साहाय्याने हे पुस्तक ‘डाऊनलोड’ करून वाचता येते.) स्वरूपात ‘अमेझॉन किंडल’वरही उपलब्ध झाले आहेत. यांपैकी ‘त्योहार मनाने की उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या हिंदी भाषेतील पहिल्या ‘ई-बूक’चे प्रकाशन ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *