Menu Close

धर्मांधांच्या तक्रारीवरून गोरक्षण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट !

गोरक्षकांना न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

Gohatya_M

वणी (जिल्हा यवतमाळ) : वणी-घोन्सा मार्गावरून नुकतीच पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात केल्यावर पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे प्रविष्ट केले. (धर्मांधांचा कावेबाजपणा ! आधी गुन्हा करायचा आणि नंतर तो उघड करणाऱ्यांविरुद्धच खोटेनाटे आरोप करत पोलीस तक्रार करायची. शासनाने गोरक्षकांचे हित जपावे अशी अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

अफजल खान हसन खान पठाण, शेख रशिद शेख मोला, साबिद खान हुर्मद खान, मेहबुब खान गुलाब खान पठाण, जब्बार खान पठाण, शेख शकील सय्यद जमाल, शेख शकील शेख रसुल, शेख इकबाल शेख मोहम्मद हे जनावरांचे व्यापारी पाच वाहनांमध्ये ३२ म्हशी आणि जनावरे घेऊन आदिलाबाद येथे ती विकण्यासाठी जात होते. घोन्सा फाट्याजवळ बजरंग दलाच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी ही वाहने थांबवली आणि जनावरे कत्तलीसाठी का नेत आहेत, अशी विचारणा केली. यावरून कार्यकर्ते आणि धर्मांध यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब वणी पोलिसांना कळवली. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस पाठवून एका धर्मांधाला कह्यात घेतले; मात्र इतर वाहतूकदार त्या वेळी घटनास्थळावरून पसार झाले.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून एका धर्मांधाला अटक करण्यात आली होती. २ दिवसांनी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लाठीने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. व्यापाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवन ऊर्फ लाला शर्मा, संतोष लक्षट्टीवार, नितीन उकनकर, प्रशांत निमकर, नीलेश परगंटीवार, अमोल धानोरकर, पवन पिंपळे, विलास चिद्दरवार आणि इतर कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *