‘पाण्यावरून तिसरे महायुद्ध होईल’, असे म्हटले जाते. त्या दृष्टीने या घटनेला अधिक महत्त्व आहे, हे लक्षात घ्या !
तेहरान (इराण) – इराणच्या अलीगूरदर्ज या ठिकाणी पाणीटंचाईमुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केल्यावर त्यांच्यावर सुरक्षादलांकडून कारवाई करण्यात आली. यात ३ जण ठार झाले. ही संख्या अधिक असल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. इराण सरकारने याविषयी सविस्तर माहिती दिलेली नाही. एका अधिकार्याने सांगितले की, या मृत्यूंना सुरक्षादल उत्तरदायी नाही, तर शांततेत चालू असलेल्या आंदोलनात एका व्यक्तीने गोळीबार केला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.
Three people including a police officer were reportedly killed as protests erupted in Iran’s southwestern province of Khuzestan over water shortageshttps://t.co/5nMo0rppHm
— WION (@WIONews) July 21, 2021
१. सी.एन्.एन्. वृत्तवाहिनीने म्हटले की, मृतांची संख्या अधिक आहे. सरकारी माध्यमांनी अल्प संख्या सांगितली आहे. अनेकजण घायाळही झाले असून हा गोळीबार पोलिसांनी केला आहे.
२. गेल्या आठवड्यात इराणच्या पश्चिम प्रांतातील लोरस्तान येथे पाणीटंचाईच्या विरोधात आंदोलनाला प्रारंभ झाला. या भागात दु्ष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेती आणि घरगुती वापरासाठी पाण्याची वानवा झाली आहे.