नवी देहली – ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा सूचीमध्ये आता तेलंगाणा राज्यातील मुलुगु जिल्ह्यातील रुद्रेश्वर मंदिराचे नाव (रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाणारे) अंतर्भूत करण्यात आले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४४ व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. वर्ष १२१३ मध्ये राजा गणपतिदेवा यांच्या काकतीय साम्राज्याच्या कारकीर्दीत मंदिर बांधले गेले होते. येथील प्रमुख देवता रामलिंगेश्वरस्वामी आहेत.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीमध्ये तेलंगाणामधील रुद्रेश्वर मंदिराचा समावेश
Tags : आंतरराष्ट्रीय