उत्तराखंडमधील हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमणे, ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय
उत्तराखंडमध्ये हिंदूंच्या भूमींवर सुनियोजितपणे अतिक्रमणे केली जात आहेत. मुसलमानांकडून अनेक ठिकाणी हिंदूंच्या आणि सरकारी भूमी अवैधरित्या ताब्यात घेतल्या जात आहेत. अशा प्रसंगी वेळीच पोलीस-प्रशासनाकडे तक्रारी करून हे थांबवता येईल. उत्तराखंडमधील हिंदूंच्या भूमीवरील सुनियोजित अतिक्रमणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. तसेच उत्तराखंड राज्याची सीमा ही नेपाळ आणि चीन यांना लागून असल्याने हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अतिशय धोकादायक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘देवभूमी उत्तराखंडच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र !’ या ‘ऑनलाइन’ विशेष संवादात बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर 5,500 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.
या वेळी ‘विश्व हिंदु परिषदे’चे उत्तराखंड राज्य उपाध्यक्ष श्री. प्रदीप मिश्रा म्हणाले की, उत्तराखंडमध्ये मुसलमानांची लोकसंख्या अल्पावधीत 40 टक्क्यांनी वाढली आहे. हरिद्वारमध्ये पाच किलोमीटर क्षेत्रामध्ये मुसलमानांना राहता येणार नाही, असा शासनादेश असतांना त्याचे पालन केले जात नाही. देवभूमी उत्तराखंडचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, त्याला रोखण्यासाठी हिंदु समाजाने पुढे आले पाहिजे. हिंदु समाजासह सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घातले पाहिजे. देवभूमी उत्तराखंडला कलंकित होण्यापासून वाचवायला हवे ! विहिंप, बजरंग दल, दुर्गावाहिनी यांचे प्रतिनिधी यासाठी प्रयत्नरत आहेत. भारतात ‘मुसलमानांसाठी एक कायदा आणि हिंदूंसाठी एक कायदा’ हे हिंदूंसाठी खूप बाधक ठरत आहे. सर्वांसाठी समान कायदा असला पाहिजे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, उत्तराखंडमध्ये फक्त हिंदूंची मंदिरे, भूमीच नव्हे, तर सरकारी आणि रेल्वेच्या भूमीही मुसलमानांनी अवैधरित्या ताब्यात घेतल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एक हजार हिंदूंचे धर्मांतर करतांना पकडला गेलेला ‘उमर गौतम’ हा मूळचा उत्तराखंडमधील ‘श्याम गौतम’ होता. जिहादींनी केलेल्या धर्मांतरणामुळे तो कट्टर धर्मांध झाला. असे कितीतरी हिंदु हे मुसलमान झाले असतील. त्यामुळे देवभूमी उत्तराखंडचे रक्षण करणे, हे सर्व भारतभरातील हिंदूंचे कर्तव्य आहे. हे जर रोखले गेले नाही, तर काश्मीरसारखी स्थिती उत्तराखंडमध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आज देशाचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, या विरोधात हिंदूंनी जागरूक होणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या ‘सेक्युलर’ व्यवस्थेमुळे आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारताला इस्लामी राष्ट्र होण्यापासून वाचवण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्याची मागणी केली पाहिजे.