मुंबई – आधुनिक वैद्यांच्या ‘प्रिस्क्रीप्शन’विना गर्भपाताच्या औषधांची ‘ऑनलाईन’ विक्री केल्याप्रकरणी ‘अॅमेझॉन’, तसेच ‘फ्लिपकार्ट’ यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. याविषयी पुणे येथील एका औषध विक्रेत्याने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. यावरून पुणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून याविषयी अधिक अन्वेषण चालू आहे. (अशा प्रकारे गर्भपाताच्या औषधांची उघडपणे अवैध विक्री होत असूनही शासकीय यंत्रणेला ही माहिती का मिळत नाही ? यामध्ये कुणाचे लागेबांधे आहेत का ? याचा शोध घेऊन या प्रकरणी कठोर कारवाई व्हायला हवी. – संपादक दैनिक सनातन प्रभात)