Menu Close

सनातनचे अमूल्य ग्रंथ आता ‘ई-बूक’ स्वरूपात ‘ॲमेझॉन किंडल’ ॲपद्वारे भ्रमणभाष, संगणक, तसेच टॅबलेट यांवर उपलब्ध !

सनातनचे ग्रंथ आता ‘ई-बूक’ स्वरूपात ‘अ‍ॅमेझॉन किंडल अ‍ॅप’ यावर उपलब्ध झाले आहेत. सध्या सनातनचा हिंदी ग्रंथ ‘त्योहार मनानेकी उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचे ‘ई-बूक’ ‘अ‍ॅमेझॉन किंडल अ‍ॅप’द्वारे विकत घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. या माध्यमातून आपला भ्रमणभाष, ‘टॅबलेट’ अथवा संगणक यांवर हे ई-बूक आपल्याला वाचता येणार आहे.

‘ई-बूक’चा लाभ घेण्यासाठी हे करा !

१. प्रथम आपल्या भ्रमणभाषवर ‘अ‍ॅमेझॉन किंडल’ (Amazon Kindle) अ‍ॅप ‘इन्स्टॉल’ करून घ्या. हे अ‍ॅप Google Play आणि Apple या ‘अ‍ॅप स्टोअर्स’वर विनामूल्य उपलब्ध आहे.

२. जर तुमच्याकडे अ‍ॅमेझॉनचे ‘अकाऊंट’ (खाते) असेल, तर ते वापरून किंडल अ‍ॅपमध्ये ‘लॉगइन’ करू शकता. जर खाते नसेल, तर नवीन खाते उघडावे लागेल.

३. त्यानंतर पुढील मार्गिकेवर क्लिक करा : https://www.amazon.in/dp/B09B2J4LLN  दुसरा पर्याय म्हणजे ‘Indian Festivals ebook Hindi’ असेही ‘सर्च बार’ मध्ये घातल्यास मार्गिकेपर्यंत जाता येईल. मार्गिकेवर डाव्या हाताला ‘त्योहार मनानेकी उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ दिसेल. त्यावर क्लिक करा.

४. ग्रंथाचे ‘ई-बूक’ खरेदी करण्यासाठी Buy Now दाबून Payment complete करा.

५. Payment झाल्यावर तुमच्या किंडल अ‍ॅपवर ग्रंथाचे ‘ई-बूक’ डाऊनलोड होईल. आता तुम्ही कधीही हा ग्रंथ वाचू शकता.

६. एकदा ग्रंथाचे ‘ई-बूक’ खरेदी केल्यावर तुम्ही तुमचे अ‍ॅमेझॉन अकाऊंट कितीही उपकरणांवर (‘devices’ वर) उघडून त्यावर ग्रंथ वाचू शकता.

७. तुम्हाला जर हा ग्रंथ इतरांना भेट म्हणून द्यावयाचा असेल, तर ‘Buy for others’च्या खाली eBook च्या किती प्रती भेट म्हणून द्यायच्या आहेत, हे select करून, नंतर ‘Buy for others’ क्लिक करावे. नंतर ‘Gift this Kindle eBook’ वर क्लिक करावे. पुढच्या पानावर ज्या व्यक्तीला तुम्ही हा ग्रंथ भेट म्हणून देण्यास इच्छुक आहात, त्यांचा ई-मेल पत्ता द्यावा आणि payment करावे. (सूचना : त्या व्यक्तीला हा ग्रंथ वाचायचा असेल, तर त्यांच्या भ्रमणभाषवरही ‘किंडल अ‍ॅप’ असणे बंधनकारक आहे.)

(सूचना : Apple च्या किंडल अ‍ॅपमध्ये थेट ‘ई-बूक’ विकत घेता येत नाही. त्यासाठी Amazon.in वर जाऊन तुमचे अ‍ॅमेझॉन किंडल अकाऊंट वापरून लॉगइन करावे. तिथे ग्रंथ विकत घेतल्यावर तुमच्या Apple च्या किंडल ‘लायब्रेरी’मध्ये ग्रंथाचे ‘ई-बूक’ दिसेल.)

सूचना : मोबाईल व्यतिरिक्त किंडल अ‍ॅप Computer (Microsoft Windows) आणि Apple Mac या प्रणालींवर तसेच Amazon (https://read.amazon.com/) च्या साहाय्याने web browser मध्येही उपलब्ध आहे.

ते डाऊनलोड करण्यासाठीच्या मार्गिका :

Computer (Microsoft Windows OS) – https://www.amazon.in/kindlepcdownload/ref=klp_hz_win

Computer (Apple MAC OS) – https://apps.apple.com/in/app/kindle/id405399194?mt=12

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *