न्यायालयाने आरोपींना एक दिवसात जामीन दिल्याने माजी सैनिकांची संघटना अप्रसन्न
-
सैनिकांवर आणि त्याच्या कुटुंबियांवर आक्रमण करण्यास धजावलेल्या राष्ट्रघातकी धर्मांधांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा झाली पाहिजे ! यासाठी राज्यातील भाजप सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
-
आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी माजी सैनिकांना मोर्चा काढावा लागतो, हे लज्जास्पद !
मडिकेरी (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी अशोक कुमार या सैनिकावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर किरकोळ अपघात झाल्यावरून काही धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. आक्रमणानंतर गंभीररित्या घायाळ झाल्यामुळे अशोक कुमार यांचे काही कुटुंबीय अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना एका दिवसात जामीन संमत केला. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या माजी सैनिकांनी आणि नागरिकांनी ३० जुलै या दिवशी येथे शांततेत निषेध मोर्चा काढून आंदोलन केले. माजी सैनिकांच्या संघटनेने म्हटले, ‘आम्ही ‘देव’ म्हणून श्रद्धा ठेवलेल्या न्यायालयानेही आमच्या सैनिकावर आक्रमण करणार्या आरोपींना केवळ एकाच दिवसात जामीन दिला. न्यायालयच आम्हाला न्याय देणार नसेल, तर आम्ही न्यायासाठी इतर कुणाकडे पहायचे ? न्याय कुणाकडे मागायचा ?’ या संघटनेने माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ‘उद्या तुमच्यावरही अशी परिस्थिती येऊ शकते’, असे सांगत संघटित होण्याचे आवाहन केले.