मजार जुनी असल्याचा मुसलमानांचा दावा !
उड्डाणपुलावर मजार बांधेपर्यंत देहली प्रशासन काय करत होते आणि अजूनही ती मजार अस्तित्वात असतांना प्रशासन काय करत आहे, हे जनतेला समजले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे, असे वृत्त ‘टीव्ही९ भारतवर्ष’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. याकडे ‘हिंदु आणि मुसलमान’ या दृष्टीकोनातून पहाण्याऐवजी वाहतुकीच्या दृष्टीने पहायला हवे’, असे या वृत्तात म्हटले आहे. (भारतात अनेक ठिकाणी सुशोभीकरण किंवा विकास यांच्या नावाखाली हिंदूंची मंदिरे पाडण्यात येतात; मात्र अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना हातही लावला जात नाही. त्यामुळे वृत्तवाहिनीने असे विधान करण्याऐवजी हे सूत्रही लक्षात घ्यायला हवे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
उड्डाणपूल चालू होतो, तेथे ही मजार बनवण्यात आली आहे. मजारच्या व्यवस्थापनाकडून ‘हा दर्गा आहे’, असे सांगण्यात आले आहे. तसेच दर्गा (मुसलमान संतांचे थडगे, ज्याला धार्मिक स्थळाचे स्वरूप दिले जाते.) अवैध नसून पुष्कळ जुना आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
१. मुसलमानांचे म्हणणे आहे की, वर्ष २००९ पासून येथे कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. येथे वर्ष १९५० च्या पूर्वी मजार बांधण्यात आली. आता पुलाच्या खाली पीर बाबाची कबर आहे.
२. अन्य एका घटनेत २४ जुलैला एका महिलेने देहलीतीलच एका मार्गावर असलेल्या मजारला स्वतःहून तोडले होते. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारितही झाला होता. पोलिसांनी तिला चौकशीला बोलावले होते. तिला हिंदु संघटनांनी समर्थन दिले होते.