Menu Close

उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्याचे नाव चंद्रनगर ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये संमत

केवळ उत्तरप्रदेशातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील गुलामगिरी दर्शवणारी नावे पालटण्यासाठी भाजप शासित सर्व राज्यांनी आणि केंद्रशासनाने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

फिरोजाबाद चे नाव पालटून चंद्रनगर करणारा ठाराव संमत

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील काचेच्या बांगड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फिरोजाबाद या जिल्ह्याचे नाव पालटून चंद्रनगर ठेवण्याची मागणी करणारा ठाराव जिल्हा परिषदेमध्ये संमत केला आहे. याचे पूर्वीचे नाव ‘चंदवाड’ होते. वर्ष १५६६ मध्ये अकबरच्या काळात ते पालटून ‘फिरोजाबाद’ करण्यात आले.

अकबरने त्याचा सरदार फिरोजशहा याला या शहारामध्ये पाठवल्यामुळे त्याचे नाव ‘फिरोजाबाद’ करण्यात आले. येथील नगरपालिकेच्या कार्यालयसमार फिरोजशहाचा मकबरा (कबर) आहे. राजा चंद्रसेनने  चंद्रवाड वसवले होते. त्यामुळे त्याच्या नावावर ‘चंद्रनगर’ नाव ठेवण्याची मागणी केली जात आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *