Menu Close

‘पी.एफ्.आय.’च्या दोघा सदस्यांविरुद्धच्या आतंकवादाविषयीच्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्यास नकार !

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपिठाचा निकाल

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपिठाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जिहादी विचारसरणीच्या संघटनेच्या दोघा सदस्यांविरुद्धचे आतंकवादाविषयीच्या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (‘सीबीआय’कडे) सोपवण्यास नकार दिला. अनशद बदरूद्दीन आणि फिरोज के.सी. अशी या दोघा सदस्यांची नावे आहेत. आतंकवादविरोधी पथकाने त्यांच्याविरुद्ध १६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी लक्ष्मणपुरी येथे गुन्हा नोंद करून त्यांना लक्ष्मणपुरीतील कुकरेल जंगलातून अटक केली होती.

आरोपी अनशद बदरूद्दीन आणि त्याचा भाऊ अझहर यांनी या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट केली होती. याचिकाकर्त्यांचे अधिवक्ते महंमद ताहीर आणि एस्.एम्. अल्वी यांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना सांगितले की, आरोपी हे ‘पी.एफ्.आय.’चे सदस्य असल्याने उत्तरप्रदेशच्या अन्वेषण यंत्रणा अन्वेषणात पक्षपात करत आहेत. आतंकवादविरोधी पथकाला अन्वेषणाचे अधिकार नसतांनाही त्याने या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण करून आरोपपत्रही प्रविष्ट केले आहे. संबंधित न्यायालयाचेही या प्रकरणाची नोंद घेण्याचे अधिकारक्षेत्र नव्हते.

न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण झाले असून आरोपपत्रही प्रविष्ट झाले आहे. आतंकवादविरोधी पथक आरोपींशी पक्षपाती वर्तन करत असल्याचे कुठलेही पुरावे आरोपी देऊ शकलेले नाहीत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *