लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्याची अनुमती हिंदु आणि शीख समाजाला नव्हती. पूर्वी अस्थी विसर्जनासाठी हिंदु आणि शीख यांना भारतात जावे लागत होते. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर त्यांना ही अनुमती मिळाली आहे. आता लंडन येथील टॅफ नदीत या दोन्ही समाजातील लोकांना त्यांच्या कुटुंबियांच्या अस्थी विसर्जन करता येणार आहेत.
? ‘This is an important aspect of the last rites for the departed souls’https://t.co/uB81Ryfarm
— BBC Wales News (@BBCWalesNews) July 31, 2021