Menu Close

वाराणसी येथे धर्मांध प्रियकराकडून हिंदु तरुणीच्या वडिलांची हत्या !

‘लव्ह जिहाद’चे धक्कादायक प्रकरण

विवाहाला विरोध केल्याने तरुणीच्याच साहाय्याने केले कृत्य !

  • लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणे, एवढ्यावर योगी शासनाने आता समाधानी न रहाता त्यासमवेतच हिंदु तरुण-तरुणींमध्ये धर्माभिमान निर्माण करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • खरेतर केंद्रशासनानेच अशा गंभीर घटनांची दखल घेत परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणे, तसेच हिंदूंना धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • हिंदु मुलीशी विवाह करण्यासाठी धर्मांध कोणत्याही थराला जाऊ शकतात, याची अनेक उदाहरणे प्रतिदिन समोर येत आहेत. अजूनही काही हिंदू हे सर्वधर्मसमभावाच्या आत्मघाती जंजाळातून बाहेर पडण्यास सिद्ध नसणे दुर्दैवी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

पोलिसांसमवेत अटक केलेले धर्मांध आरोपी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – धर्मांध तरुणाशी विवाह लावून देण्यास नकार दिल्याने मुलीने स्वत:च्याच वडिलांच्या हत्येत साहाय्य केल्याची धक्कादायक घटना नुकतीच वाराणसी येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलगी, तिचा प्रेमी जावेद अहमद आणि त्याचा मित्र आकीब अंसारी या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून बंदुक, मोटारसायकल आणि एक मोबाईल देखील कह्यात घेण्यात आला आहे.

१. मिर्झामुराद पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील तमाचाबाद येथील किराणा व्यावसायिक राजेश जायस्वाल (वय ४६ वर्षे) यांना त्यांच्या मुलीचे गावातल्याच जावेद अहमद याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे आढळून आले होते. विवाह लावून देण्यासाठी वर्षभरापूर्वी दोघांनीही जायस्वाल यांच्यावर दबाव टाकला होता. हा विवाह करून देण्यास जायस्वाल सिद्ध नव्हते. त्यामुळे मुलगी, प्रेमी जावेद आणि त्याचा मित्र आकीब यांनी मिळून जायस्वाल यांना त्यांच्या मार्गातून दूर करण्याचा कट रचला.

२. २९ जुलै या दिवशी जायस्वाल हे त्यांच्या सासूसाठी रुग्णालयात जेवणाचा डबा घेऊन निघाले होते. याविषयी त्यांच्या मुलीनेच आरोपींना माहिती दिली. त्यानंतर आरोपी जावेद आणि त्याचा मित्र आकीब यांनी त्यांचा पाठलाग केला. ते रोहनिया येथील करनाडाडी महामार्गाच्या उड्डाणपुलावर येताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याविषयी पोलिसांनी नुकताच खुलासा केला आहे.

३. यापूर्वी ही हत्या ‘प्रॉपर्टी’च्या (संपत्तीच्या) वादातून झाली असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे त्यांनी मृतकाचा भाऊ आणि दोन पुतणे अशा तिघांच्या विरोधात प्रकरणाची नोंद केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे अधिक खोलात जाऊन अन्वेषण केले. तेव्हा त्यांना हत्येमागील खर्‍या सूत्रधारांपर्यंत पोचता आले आणि त्यातूनच जायस्वाल यांची मुलगी, तिचा धर्मांध प्रियकर जावेद आणि त्याचा मित्र आकीब यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *