Menu Close

८१ हिंदु कुटुंबांची पलायन करण्याची चेतावणी !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे संकुलात रहाणार्‍या बहुसंख्य हिंदूंचा धर्मांधांकडून मानसिक छळ !

  • स्वतःच्या घरावर लावला ‘घर विकणे आहे’ असा फलक !

  • पोलिसांकडून चौकशी चालू !

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

  • हिंदू बहुसंख्य असतांनाही अल्पसंख्य त्यांचा छळ करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

  • जर धर्मांध अल्पसंख्य असतांनाही बहुसंख्य असणार्‍या हिंदूंचा छळ करतात, तर ते उद्या बहुसंख्य झाल्यास हिंदूंचे अस्तित्वच शिल्लक रहाणार नाही, हे हिंदू लक्षात घेतील का ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील लाजपतनगरच्या शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी स्वतःच्या घरावर ‘घरे विकणे आहे’, असा फलक लावला आहे. धर्मांधांनी या संकुलाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांच्या परिसरातील हिंदूंची घरे विकत घेतली आहेत. त्यासाठी त्यांनी बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कम दिली आहे. या घरांत रहाणारे धर्मांध मांसाहार करून त्याचे तुकडे संकुलात रहाणार्‍या हिंदूंच्या घरांसमोर फेकतात, असा हिंदूंनी आरोप केला आहे. यामुळे येथे अस्वच्छता निर्माण होते. येथे रहाणारे बहुसंख्य हिंदू शाकाहारी आहेत. हिंदूंनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाला चेतावणी दिली आहे की, धर्मांधांनी विकत घेतलेल्या घरांची नोंदणी रहित करण्यात यावी अन्यथा सर्व ८१ हिंदु कुटुंबे येथून पलायन करतील.

१. हिंदूंचे म्हणणे आहे की, सध्या ५० लाख रुपये बाजारमूल्य असणारी परिसरातील हिंदूंची घरे धर्मांधांकडून ३ कोटी रुपयांना विकत घेतली जात आहेत. (हा धर्मांधांचा ‘लँड जिहाद’ नव्हे का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) सरकारने घरे विकत घेणार्‍यांकडे ‘इतके पैसे कुठून आले ?’ याची चौकशी करण्याचीही मागणी हिंदूंनी केली आहे. (हिंदू धर्मांधांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना घरे विकतात आणि अन्य हिंदूंना संकटात टाकतात. यावरून त्यांची धर्मभावना किती तकलादू आहे, हे स्पष्ट होते ! अशा हिंदूंचे आपत्काळात देवाने तरी रक्षण का करावे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. हिंदूंनी आरोप केला आहे की, धर्मांध षड्यंत्र रचून त्यांना येथून पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. बकरी ईदच्या दिवशीही मांस आणि त्याचे तुकडे घरांजवळ टाकण्यात आले. (घरांजवळ मांस टाकणार्‍या धर्मांधांना वैध मार्गाने जाब विचारून त्यांना पुन्हा तसे न करण्याची चेतावणी देण्याचेही धाडस हिंदू  दाखवू शकत नाहीत का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

३. हिंदूंनी संतप्त होऊन ‘आम्ही पलायन करावे कि धर्मांतर ?’, असा प्रश्न विचारला आहे. (२-३ धर्मांधांच्या घरांमुळे बहुसंख्य हिंदू घाबरून धर्मांतर आणि पलायनाच्या गोष्टी करत असतील, तर इस्लामी देशांतील हिंदूंची कशी स्थिती असेल, हे लक्षात येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

४. अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी ‘याविषयी मुरादाबाद पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले आहे’, अशी माहिती दिली.

५. येथील अपर शहर दंडाधिकारी राजेश कुमार यांनी या संकुलाला भेट देऊन हिंदूंशी चर्चा केली. त्यांनी ‘हिंदूंच्या भावना जाणून घेऊन याविषयीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात येईल’, असे सांगितले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *