Menu Close

‘भारत के वामपंथी चीन के गुलाम ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार्‍या साम्यवादी नेत्यांविरोधात सरकारने फौजदारी खटले दाखल करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

देशभक्तीपेक्षा कोणतीही विचारधारा मोठी असू शकत नाही; मात्र शत्रूराष्ट्र चीनशी मित्रता ठेवणार्‍या डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना फक्त स्वत:ची विचारधारा महत्त्वाची वाटते. त्यांना भारताशी, तसेच भारतीय संस्कृतीशी काही देणे-घेणे नाही. एका बाजूला आपले सैनिक सीमेवर चीनविरोधात लढत आहेत, तर दुसर्‍या बाजूला ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीनी दुतावासाने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशातील प्रमुख साम्यवादी नेत्यांनी उपस्थित राहून चीन, तसेच चीनच्या धोरणांची प्रशंसा केली. हा देशद्रोहच आहे. हे कुठल्या अतिरेकी कृत्यांपेक्षा कमी धोकादायक नसून भारत तोडण्याचे काम आहे. भारत सरकारने या साम्यवादी नेत्यांच्या विरोधात फौजदारी खटले दाखल करावेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायलयाचे अधिवक्ता गौरव गोयल यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारत के वामपंथी चीन के गुलाम’ या ‘ऑनलाइन’ विशेष संवादात ते बोलत होते.

या वेळी अधिवक्ता गोयल पुढे म्हणाले की, हेच डावे लोक हिंदूंचा प्रचंड तिरस्कार करतात. साम्यवाद्यांनी गेल्या शतकात जगभरात करोडो लोकांचा नरसंहार केला आहे. त्यांचे खरे स्वरूप आता उघड झाले आहे. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांद्वारे हजारो लोकांनी पाहिला.

युवा ब्रिगेडचे लेखक आणि मार्गदर्शक श्री. चक्रवर्ती सुलिबेले म्हणाले, ‘भारताला पूर्वीपासूनच म्हणजे अगदी काँग्रेसच्या राजवटीच्या काळातही चीनचा आपल्या देशाला धोका होता. डाव्यांचा इतिहास भारताच्या विरोधातच आहे. हे लोक देशापेक्षा आपले आणि आपल्या पक्षाचे सिद्धांत मोठे मानून भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षणासह विविध क्षेत्रांत यांनी आपले जाळे पसरले असून हे भारताच्या बाजूने कधीच राहणार नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. यांच्याविरोधात कारवाई होईपर्यंत आपण सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे.’

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘1962 च्या भारत-चीन युध्दाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची डाव्यांची जी विचारसरणी होती, आताही तीच आहे आणि पुढेही तीच राहील. नक्षलवादाची देण देणारे हे डावे लोक चीनच्या ‘स्लीपर सेल’प्रमाणे काम करत आहेत. सरकारने हे ‘स्लीपर सेल’ला नष्ट करायला हवेत. हिंदूंचे सण, ग्रंथ यांपासून ते भारताच्या सीमेवरील विकासकामांना हे ‘डावे’ सतत विरोध करत असतात. भारताचे तुकडे करणे यांसाठीच हे कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याच्या विरोधात येणार्‍यांना धडा शिकवला. आपणसुद्धा महाराजांचा आदर्श समोर ठेवून विविध मार्गांनी देशाच्या विरोधात कार्यरत असणार्‍या डाव्या विचारसरणीच्या संघटना, पक्ष यांवर बंदी येईपर्यंत, तसेच हे कारागृहात जाईपर्यंत हा लढा चालू ठेवला पाहिजे.’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *