Menu Close

बिहार शिक्षण मंडळाच्या इयत्ता ५ वीच्या क्रमिक पुस्तकात मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पाडणारा धडा !

बिहारमधील युती सरकारमधील भाजपने हा धडा वगळण्यासाठी शिक्षण मंडळाला आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही धडा वगळला जाईपर्यंत याचा पाठपुरावा करावा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रज यांची ‘सर्वात्मका सर्वेश्‍वरा’ ही कविता धर्मांधांनी विरोध केल्यामुळे शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून काढण्यात आली होती, तर अन्य धर्मियांच्या संदर्भातील असे धडे कसे चालतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील शिक्षण मंडळाच्या ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या) इयत्ता ५ वीच्या ‘ब्लॉसम पार्ट-४’ या क्रमिक पुस्तकात मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पडेल, अशा आशयाचा धडा देण्यात आला आहे. ‘जिझस टू सुपर’ या मथळ्याखालील हा धडा आहे. यामध्ये एक कुटुंब येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी कसे आतुर असते, येशूचे कृपाछत्र मिळावे याकरता त्या कुटुंबाचा प्रयत्न कसा असतो, अशी काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *