Menu Close

दांडा, शिवोली (गोवा) : सद्गुरु जीवनमुक्त महाराजांच्या आश्रमातील राष्ट्रधर्म जागरण सभेत हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

shivoli_Drsolanki
डॉ. मनोज सोलंकी (डावीकडून तिसरे) यांचा सत्कार करतांना (डावीकडून पहिले) पू. मुकुंदराज महाराज आणि बाजूला अन्य मान्यवर

शिवोली : दांडा, शिवोली येथील सद्गुरु जीवनमुक्त महाराज मठात २३ एप्रिल या दिवशी झालेल्या राष्ट्रधर्म जागरण सभेत हिंदु राष्ट्रासाठी अविरतपणे कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी हा सत्कार स्वीकारला. त्याचसमवेत गोव्यात गोरक्षणाचे कार्य करणारे श्री. हनुमंत परब, तसेच मंत्र, तंत्र या माध्यमाने रोग-व्याधी निवारण करणारे पुणे येथील डॉ. मोहन फडके, कोल्हापूर येथील पंचांगविद्यातज्ञ श्री. सतीश सहस्रबुद्धे, आध्यात्मिक कार्य करणारे नगर येथील श्री शीतल महाराज, मुंबई येथील श्री मनोहरानंद स्वामी यांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच ज्ञानदीप प्रतिष्ठान गोवा आणि दोन स्थानिक पत्रकार यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

श्री सद्गुरु जीवनमुक्त महाराज जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त या राष्ट्रधर्म जागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी गीतरामायणाचा कार्यक्रम झाला. सभेत पू. मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते उपस्थितांचा गौरव करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर सत्कारमूर्तींबरोबर कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, पू. शाहू महाराज, पुणे येथील देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. विनय मडगावकर यांनी केले, तर स्वागत श्री. शिवाजी देसाई यांनी केले. या वेळी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय हरमलकर, शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संतांची मांदियाळी हे महानाट्य सादर करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपण विसरलो आहेत. देशातील अराजक दूर करण्यासाठी सावरकरांसारख्या मोठ्या नेत्याची भारताला आवश्यकता आहे, असे मंत्री दयानंद मांद्रेकर म्हणाले. हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे विज्ञान आहे. हे विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे, असे गौरवमूर्ती डॉ. मोहन फडके यांनी या वेळी सांगितले. पू. शाहू महाराज यांचे मार्गदर्शन आणि श्री. चंद्रकांत शहासने यांचेही भाषण या वेळी झाले.

क्षणचित्रे

१. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि जीवनपट दर्शवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रप्रदर्शन या ठिकाणी भरवले गेले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. संजय हरमलकर यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. रमेश नाईक, पू. शाहू महाराज, पू. मुकुंदराज महाराज उपस्थित होते.

२. असे प्रदर्शन यापूर्वी केवळ हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक आयोजित करत असत. आता जीवनमुक्त महाराज मठातही असे प्रदर्शन भरवल्याचा मला आनंद होत आहे, असे उद्गार श्री. रमेश नाईक यांनी या वेळी काढले.

३. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभक्तांविषयीच्या फलकांचे प्रदर्शनही या ठिकाणी भरवले गेले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *