श्री. नंदकिशोर मते यांना सिंहगडावरील संशोधनाच्या शोधप्रबंधासाठी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त !
पुणे – हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी श्री. नंदकिशोर मते यांना त्यांच्या सिंहगडावरील संशोधनाच्या शोधप्रबंधासाठी विद्यावाचस्पती (पी.एच्.डी.) पदवी मिळाली आहे. सिंहगड-अॅन आर्किओलॉजिकल पर्स्पेक्टीव्ह (पुरातत्व दृष्टीकोनातून सिंहगड) या विषयावर पुरातत्वशास्त्राच्या शिक्षणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या डेक्कन महाविद्यालयातून त्यांना हे यश मिळाले आहे. या यशासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑगस्ट या दिवशी त्यांचा सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांनी श्री. मते यांना सनातन निर्मित श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली. या वेळी समितीचे श्री. पराग गोखले हे उपस्थित होते.
श्री. नंदकिशोर मते यांनी शोधप्रबंधासाठी वर्ष २००९ पासून अथक परिश्रम घेत अभ्यास केला. सर्वकाही इश्वरकृपेने शक्य झाले असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या खडकवासला जलाशय रक्षण चळवळया उपक्रमात श्री. नंदकिशोर मते यांचे नियमित सहकार्य असते. ते दैनिक सनातन प्रभातचे वाचक आणि जाहिरातदार आहेत, तसेच समितीच्या अन्य उपक्रमांतही त्यांचा सक्रीय सहभाग असतो.