आम आदमी पक्षाकडून हज हाऊस बांधण्याला अनुमती आणि १०० कोटी रुपयांची तरतूद !
उत्तर भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी देशभरातील हिंदूंसाठी देहली हे एक मध्यवर्ती ठिकाण असतांना ‘तीर्थयात्रा करणार्या हिंदूंसाठी काही करावे’, असे आम आदमी पक्षाला का वाटत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
देशातील अनेक ठिकाणी हज हाऊस बांधले असतांना आणि आता हजला जाणार्या भारतियांच्या संख्येत कपात करण्यात आली असतांना हज हाऊसची काय आवश्यकता आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
देहली – येथील द्वारका भागातील भरथल चौकामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ३२ गावांतील नागरिक यांनी प्रस्तावित ‘हज हाऊस’च्या विरोधात ६ ऑगस्ट या दिवशी आंदोलन केले. या वेळी ६५० हून अधिक लोक आंदोलनात सहभागी झाले होते. विश्व हिंदु परिषद, हिंदु शक्ती संघटना, सकल पंचायत पालम ३६०, देहली प्रदेश ग्रामपंचायत परिषद, ‘ऑल द्वारका रेसिडेंट्स फेडरेशन’, सर्व रहिवाशी संघ, या संघटनांसह तिहार क्षेत्रातील नागरिक, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Protest in Delhi’s Dwarka against upcoming Haj house https://t.co/XcG42VJlPP
— Hindustan Times (@HindustanTimes) August 6, 2021
१. आम आदमी पक्षाच्या सरकारकडून हज हाऊससाठी ७ सहस्र चौरस मीटर भूमी देण्यात आली आहे. येथील भूमीचा दर प्रतिचौरस मीटरसाठी अडीच ते ३ लाख इतका आहे.
२. या भागामध्ये मुसलमान नागरिक रहात नाहीत, तसेच देहलीमध्ये वक्फ बोर्डाकडे मोठ्या प्रमाणात भूमी असतांना हिंदूंच्या भूमीवर हज हाऊस का बांधण्यात येत आहे ? या ठिकाणी शाळा, महाविद्यालय अथवा रुग्णालय का उभारण्यात येत नाही ? असे प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून गावकर्यांनी उपस्थित केले आहेत.
३. देहलीच्या विकासासाठी, तसेच लोकांना सोयीसुविधा मिळाव्यात, या हेतूने गावकर्यांनी त्यांची भूमी सरकारला दिली होती. त्या प्रमाणे तेथे मोठी वसाहत निर्माणही झाली; मात्र आता राज्यातील आम आदमी पक्षाचे सरकार येथे हज हाऊस बांधण्यास अनुमती देऊन त्याच्यावर १०० कोटी रुपये व्यय करणार आहे. या हज हाऊसला तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी अनुमती दिली होती; मात्र त्याला विरोध झाल्याने ते रहितही करण्यात आले होते; मात्र आता आम आदमी पक्षाच्या सरकारकडून याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ आणि गावकरी यांच्याकडून आंदोलन केले जात आहे.