१. आदिवासी विद्यार्थ्यांना बलपूर्वक धर्मांतर करण्यास भाग पाडणारे फादर आणि मुख्याध्यापक !
डहाणूतील जंगलपट्टी-आदिवासी भागात असलेल्या, शासकीय अनुदान घेणार्या, ख्रिस्ती मिशनर्यांच्या शाळांमधे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन तेथील फादर आणि मुख्याध्यापक बलपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडत असून, वेळ आल्यास आदिवासींचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात आहे.
२. पालकांनी आपल्या पाल्यांचे धर्मांतर करण्यास विरोध केला; म्हणून लायोला माध्यमिक आश्रम शाळेत त्या मुलांना प्रवेश देण्यास नकार देणारे फादर जेकब आणि मुख्याध्यापक लुईस मासमार !
डहाणूच्या जंगलपट्टीतील नागझरी-डोंगरीपाडा या दुर्गम भागात लायोला माध्यमिक आश्रम शाळा असून, शासकीय अनुदान मिळणारी ही शाळा ख्रिस्ती मिशनरीमार्फत चालवली जाते. तेथील आदिवासी पालक साहिल नांगरे, रोहित मोरघा, समीर मोरघा, कृतिक ढाक या चार मुलांना शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले असता, तेथील फादर जेकब आणि मुख्याध्यापक लुईस मासमार यांनी त्यांना धर्मांतर करण्यास सांगितले. त्याला पालकांनी विरोध करताच त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यास नकार देण्यात आला.
३. फादर आणि मुख्याध्यापक यांना धारेवर धरून खडसवणारे शिवसैनिकांचे शिष्टमंडळ !
शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने या मिशनरी शाळेस धडक देऊन तेथील फादर आणि मुख्याध्यापक यांना धारेवर धरून खडसवले.
४. धर्मांतर करणार्या मिशनर्यांचे शासकीय अनुदान बंद करण्याची शिवसेेनेकडून मागणी !
या मिशनर्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या अंतर्गत शासकीय अनुदान देऊन शासनाने एकप्रकारचे साहाय्यच केले आहे. गोरगरीब आदिवासींना फूस लावून त्यांचे धर्मांतर करून घेणार्या या मिशनर्यांचे शासकीय अनुदान बंद करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात