जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी अशा प्रकारची थातूरमातुर कारवाई करण्यात येत आहे. अशांना कठोर शिक्षा झाली, तरच ‘कारवाई झाली’, असे म्हणता येईल !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरातील श्री गणपति मंदिराची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ५० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १५० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. तोडफोडीच्या घटनेविषयी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी म्हटले की, ही घटना लाजिरवाणी आहे. अशाच प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम चालू आहे. (पाकमधील राजकारण्यांच्या अशा आश्वासनांवर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
२. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष साहाय्यक डॉ. शहबाज गिल यांनी ट्वीट करून म्हटले की, ही घटना अतिशय दु:खद आणि खेदजनक आहे. पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची नोंद घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पाकिस्तानची राज्यघटना अल्पसंख्यांकांना त्यांची पूजा करण्याचे स्वातंत्र्य देते आणि सुरक्षाही पुरवते. (असे केवळ बोलून हिंदूंचे संरक्षण होणार नाही, तर प्रत्यक्ष संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)