Menu Close

दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांधासमवेत पलायन !

लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांधांकडून हिंदु कुटुंबांना उद्ध्वस्त केले जात आहे. मतांच्या राजकारणासाठी सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आतापर्यंत लक्षावधी हिंदु मुलींचे धर्मांतर होऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे हिंदु धर्म वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कडब (दक्षिण कन्नड) – येथील एक १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. त्याच वेळी गावातील एक धर्मांध युवकही गावातून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांसह पळून गेले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

ही विद्यार्थिनी महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडली. ती सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध केली; परंतु ती कुठेही आढळून न आल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली. त्याच वेळी २४ वर्षांचा हनीफ हा युवकही गावातून बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘हे लव्ह जिहादचे प्रकरण असावे’, अशी चर्चा केली जात आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *