Menu Close

कराची (पाकिस्तान)येथे श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या विरोधात हिंदूंची निदर्शने !

भगवे झेंडे हातात धरून ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’च्या दिल्या घोषणा !

कुठे इस्लामी देशात धर्महानी टाळण्यासाठी संघटित होणारे तेथील धर्माभिमानी हिंदु, तर कुठे हिंदू बहुसंख्य असलेल्या भारतात विविध माध्यमांतून धर्महानी होत असतांना त्याला विरोध न करणारे जन्महिंदू ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

कराची येथे निदर्शने करताना अल्पसंख्य हिंदु

कराची (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतात काही दिवसांपूर्वी श्री गणपति मंदिराच्या झालेल्या तोडफोडीच्या विरोधात पाकच्या कराची शहरात रहाणार्‍या अल्पसंख्य हिंदूंनी निदर्शने केली. या वेळी त्यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणाही दिल्या. भगव्या झेंड्यांसह ‘आम्हाला न्याय हवा’ अशा आशयाचे फलकही त्यांनी हातात धरले होते. शहरातील प्रेस क्लबबाहेर हिंदूंनी ही निदर्शने केली. या वेळी शीख, पारसी, ख्रिस्ती आणि अन्य समूदायातील लोकही सहभागी झाले होते.

इस्लामचा अवमान करणार्‍यांना फाशी होते, तशी हिंदूंच्या धर्माचा अवमान करणार्‍यांनाही फाशी व्हावी ! – कराचीतील प्रसिद्ध प्राचीन हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी रामनाथ मिश्रा महाराज

कराचीत प्रसिद्ध असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी रामनाथ मिश्रा महाराज संबोधित करताना

कराचीत प्रसिद्ध असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी रामनाथ मिश्रा महाराज हेही आंदोलनात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, गुंडांनी ज्या प्रकारे श्री गणपति मंदिराची तोडफोड केली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ज्याप्रमाणे इस्लाममध्ये धर्माचा अवमान करणार्‍यांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाते, त्याचप्रमाणे आमच्या धर्माचा अवमान करणार्‍यांनाही शिक्षा झाली पाहिजे.

भारतातील मुसलमान आनंदात रहातात ! – कराचीचे मुफ्ती फैसल

या आंदोलनामध्ये कराचीचे मुफ्ती (शरीयत कायद्याचे जाणकार, विद्वान) फैसल हेही सहभागी झाले होते. ते म्हणाले की, मी मुसलमान आहे; पण ‘समाजामध्ये द्वेष निर्माण करणारे प्रसंग घडू नयेत’, असे मला वाटते. आजही भारतामध्ये मुसलमान अल्पसंख्य आहेत. माझे अनेक नातेवाईक भारताच्या विविध शहरांमध्ये रहातात आणि तेथे सर्वजण आनंदी आहेत. (भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना चपराक ! ‘भारतात हिंदुत्वनिष्ठ संघटना मुसलमानांचा छळ करतात’, अशी ओरड हे ढोंगी नेहमीच करत असतात. त्यांनी आता मुफ्ती फैसल यांच्या विधानावर तोंड उघडले पाहिजे आणि पाकमधील हिंदूंच्या रक्षणार्थ आवाज उठवला पाहिजे, तरच ते खरे निधर्मी आहेत, हे सिद्ध होईल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *