Menu Close

५ हून अधिक मुले असणार्‍या केरळमधील ख्रिस्त्यांना कॅथॉलिक चर्च आर्थिक साहाय्य करणार !

ख्रिस्त्यांच्या धार्मिक संघटनांचे धर्मबंधुत्व जाणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

प्रातिनिधिक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ कॅथॉलिक बिशप्स काऊंसिल (के.सी.बी.सी.) या संघटनेने केरळमधील ख्रिस्त्यांच्या घटत्या जन्मदराविषयी चिंता व्यक्त केली आहे; मात्र दुसरीकडे केरळ कॅथॉलिक चर्चकडून कल्याणकारी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ज्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये ५ हून अधिक मुले आहेत, त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. या अंतर्गत वर्ष २००० नंतर विवाह झालेल्या आणि ज्यांना ५ मुले आहेत, त्यांना मासिक दीड सहस्र रुपये देण्यात येणार आहेत.

के.सी.बी.सी.ने परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, वर्ष १९५० मध्ये केरळमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या २४.६ टक्के होती; मात्र आता ती १७.२ टक्के इतकी झाली आहे. ख्रिस्ती धर्म १.८ जन्मदराचा धर्म बनला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *