लाहोर (पाकिस्तान) – पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरात ४ ऑगस्टला मुसलमानांच्या जमावाने तोडफोड केलेल्या श्री गणपति मंदिराची पाक सरकारकडून डागडुजी केल्यानंतर ते मंदिर पुन्हा हिंदूंकडे सुपुर्द करण्यात आले आहे. (पाक सरकारने आता पाकमधील प्रत्येक हिंदू मंदिराला संरक्षण देऊन अशा घटना घडणार नाहीत, याकडे लक्ष द्यायला हवे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)