अशाच प्रकारे आधी अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी अवैध संबंध बनवायचे, नंतर ‘ब्लॅकमेल’ करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडायचे आणि शेवटी त्यांच्याशी लग्न करायचे, असे प्रकार वाढत चालले आहेत. या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मडियांव येथील एका खासगी शाळेतील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनीला तिच्याच वर्गात शिकणार्या धर्मांध विद्यार्थ्याने अश्लील संदेश पाठवून धमकावले. आरोपीने हे संदेश आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरून पाठवल्याचे दर्शवून विद्यार्थिनीला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याला त्याचा भाऊ मोहंमद सैफ याने साहाय्य केले. याप्रकरणी अल्पवयीन विद्यार्थ्याला बाल न्यायालयामध्ये पाठवण्यात आले असून त्याच्या मोठ्या भावाच्या विरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
१. ८ वीमध्ये शिकणार्या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर १५ जुलै या दिवशी विदेशी क्रमांकावरून अश्लील संदेश पाठवण्यात आले. तसेच विविध विदेशी क्रमांकांवरून दूरभाष करून तिला त्रासही देण्यात आला. विद्यार्थिनीने याला विरोध केल्यावर तिला धमकी देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पोलीसात तक्रार प्रविष्ट केली.
२. पोलीस अधिकारी प्राची सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थीनीला एका लॅण्डलाईन क्रमांकावरूनही दूरभाष आला होता. अन्वेषणानंतर हा क्रमांक्र पलटन छावनी येथील मोहंमद सैफ खान याचा असून ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक हा त्याचाच १३ वर्षीय भाऊ वापरत असल्याचे आढळून आले. मोहंमद सैफ हा पदवीप्राप्त असून लहान भावासमवेत पीडितेला त्रास देत होता. (गरिबीमुळे धर्मांध गुन्हेगारीकडे वळतात, हा गोड अपसमज आहे. ते कितीही शिकले, तरी त्यांच्यातील वृत्तीत पालट होणार नाही, हे लक्षात घ्या आणि त्यांना दिलेल्या सवलती (खैराती) परत घेऊन त्या इतर गरीब विद्यार्थ्यांना द्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
३. ‘ऑनलाईन’ वर्गासाठी शाळेने ‘व्हॉट्सॲप’ गट बनवला होता. या गटामध्ये काही विद्यार्थ्यांना ‘ॲड्मिन’ करण्यात आले होते. याचा आरोपींनी अपलाभ घेतला.
४. पीडितेला ज्या क्रमांकावरून दूरभाष यायचा, तो विदेशी क्रमांक वाटायचा. सायबर तज्ञांच्या अन्वेषणामध्ये समजले की, आरोपीने त्यांच्या भ्रमणभाषसंचामध्ये एका ‘ॲप’चा समावेश केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून दूरभाष आल्यावर विद्यार्थिनीच्या भ्रमणभाषसंचावर तो विदेशी असल्याचे दाखवायचा. त्यामुळे पोलीसही अनेक दिवस गोंधळात पडले होते.