Menu Close

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन

हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा सक्रीय सहभाग

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील धर्माभिमानी अधिवक्ता दीपक तिवारी प्रत्येक रविवारी हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करतात. गेल्या २ आठवड्यांपासून या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समिती सहभागी होत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रशांत वैती आणि सिमित सरमळकर यांनी केरळमधील मंदिरांवर होत असलेल्या आक्रमणांविषयीची माहिती दिली. तसेच ‘हे आघात थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

या ‘ऑनलाईन’ बैठकीला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी मंदिरांच्या समस्यांविषयी चर्चा केली. तसेच न्यूनतम ५ मंदिरांशी जोडलेल्या हिंदूंना संघटित करण्याचा निश्चय केला. या वेळी अधिवक्ता दीपक तिवारी यांनी ‘सर्वांना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक रविवारी धर्मशिक्षणाचे सत्र घेण्यात येईल’, असेही सांगितले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील ‘आझाद हिंद भगत संघटने’च्या कार्यकर्त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – सीतापूर आणि लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ‘आझाद हिंद भगत संघटने’च्या वतीने एका ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. प्रशांत वैती आणि श्री. सिमित सरमळकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आझाद हिंद भगत संघटनेच्या कार्यकर्त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रीय सहभागी होण्याविषयी आवाहन करण्यात आले. त्यांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बैठकीला संघटनेचे अनेक कार्यकर्ते ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.

क्षणचित्र : या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या एका युवकाने समितीच्या कार्यकर्त्यांना विचारले, ‘‘तुम्ही त्याच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहात का, जी सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात धर्मकार्य करत आहे ?’’ त्यावर समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘हो’ असे सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *