हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे धर्मांध ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
हिंदूंनो, हिंदु धर्म आणि संत यांचा अवमान करणार्यांना संघटितपणे वैधमार्गाने विरोध करा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
बेळगाव – येथील धर्मांध उपाहारगृह मालकाच्या ‘नियाज हॉटेल’कडून सामाजिक संकेतस्थळावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विज्ञापन ‘पोस्ट’ करण्यात आले होते. ‘नियाज’ची बिर्याणी खाल्यावर एक साधू ‘बलीदान देना होगा’ ऐवजी ‘बिर्याणी’ देना होगा’, असे वाक्य उच्चारत असल्याचे दाखवण्यात आले होते. याच्या विरोधात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांनी पोलीस उपायुक्त विक्रम आवटे यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली. या वेळी विश्व हिंदु परिषद जिल्हा कार्यदर्शी श्री. विजय जाधव, बजरंग दल जिल्हा संयोजक श्री. भावकन्ना लोहार, बजरंग दल नगर संयोजक श्री. आदिनाथ गावडे उपस्थित होते. पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केल्यावर हे उपाहारगृह बंद ठेवण्यात आले असून या उपाहारगृहाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (धर्मांध नेहमीच हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी विज्ञापने प्रसिद्ध करतात. अशाच प्रकारे स्वत:च्या धर्माचे विडंबन करण्याचे धाडस ‘नियाज हॉटेल’ कधी दाखवेल का ? अशांच्या विरोधात पोलीस प्रशासनानेही कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
हिंदु धर्माच्या विषयी ‘नियाज हॉटेल’ने कुठलेही विज्ञापन प्रसिद्ध करतांना विचार करावा. हिंदु साधू-संत यांच्या संदर्भात अपमानास्पद विज्ञापन प्रसिद्ध करू नये. असा प्रकार परत झाल्यास त्यांना रोखठोक भाषेत उत्तर देण्यात येईल आणि त्यांच्याशी व्यवहार पूर्णत: बंद करून टाकण्याचे आवाहन करण्यात येईल, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी दिली आहे. (जे उपाहारगृह हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी विज्ञापने प्रदर्शित करतो, त्यावर हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे हिंदूंनी ठरवल्यास चूक ते काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)