Menu Close

देशातील सर्व मदरसे शिक्षणाधिकार्‍यांच्या कक्षेत येणे आवश्यक ! – बालहक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग

  • अल्पसंख्य समाजाच्या शाळांमध्ये ६२.५० टक्के विद्यार्थी दुसर्‍या समाजांतील !

    ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळांमध्ये ७४ टक्के विद्यार्थी बहुसंख्य समाजातील !

    देशातील ७१.९६ टक्के शाळा अल्पसंख्य ख्रिस्त्यांच्या कह्यात !

अल्पसंख्यांकांच्या शाळेत बहुसंख्य हिंदू शिकतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत हिंदूंनी स्वधर्मातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शाळा उघडल्या नसल्याने आज हिंदु विद्यार्थी ख्रिस्त्यांच्या शाळांत जाऊन त्यांच्या विचारांचे संस्कार करवून घेतो आणि हिंदु धर्माकडे पाठ फिरवतो ! हिंदु राष्ट्रात ही स्थिती पालटण्यात येईल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – अल्पसंख्य समाजातील मुलांच्या शिक्षणाविषयी चिंताजनक माहिती समोर आल्याने देशातील सर्व मदरसे आणि इतर अल्पसंख्य समाजांतील शाळा शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाराच्या कक्षेत आणाव्यात, अशी शिफारस बालहक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाने (‘एन्.सी.पी.सी.आर्.’ने) राष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्वेक्षणानंतर केली आहे.

१. आयोगाने केलेल्या सर्वेक्षणामधून आलेल्या निष्कर्षांनुसार देशात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालवलेल्या शाळांमध्ये ७४ टक्के विद्यार्थी अल्पसंख्य नसलेल्या समाजातील आहेत. देशातील ७१.९६ टक्के शाळा अल्पसंख्य ख्रिस्त्यांच्या कह्यात आहेत.

२. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे (प्रचलित शिक्षणपद्धतीत असलेल्या शाळांमध्ये न शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे) सर्वाधिक प्रमाण मुसलमानांमध्ये आढळून आले. त्यांची संख्या १ कोटी १० लाख इतकी नोंदवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मदरसे, मिशनर्‍यांकडून चालवण्यात येणार्‍या शाळा आणि इतर सर्व अल्पसंख्य समाजाच्या शाळा शिक्षणाधिकार्‍यांच्या कक्षेत येणे आवश्यक आहे, अशी शिफारस आयोगाने केली आहे.

३. अनेक शाळांनी सर्व शिक्षा अभियानाच्या नियमांमधून सवलत मिळावी; म्हणून ‘अल्पसंख्य शाळा’ अशी नोंदणी केलेली आहे.

४. अल्पसंख्य समाजातील शाळांमधील केवळ ८.७६ टक्के विद्यार्थी हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *