हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवक आणि युवती यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन !
सांगली – प्रेमामध्ये एकमेकांविषयी निष्ठा आणि आदराची भावना असते. प्रेमामध्ये त्याग असतो; परंतु ‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदु युवतींना फसवून त्यांना यातनांच्या खाईत लोटण्यासारखे आहे. ‘लव्ह’ म्हणजे फसवे प्रेम आणि ‘जिहाद’ म्हणजे जगावर इस्लामी राज्य प्रस्थापित करणे होय. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या युवतींकडे केवळ अपत्य निर्मितीचे यंत्र म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या युवतींचा उपयोग केवळ उपभोगाची वस्तू म्हणूनच केला जातो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवक आणि युवती यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ आयोजित करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद – एक भीषण समस्या आणि त्यावरील उपाय’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाचा लाभ १५० हून अधिक युवक आणि युवती यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. मेघा लंबे यांनी केले.
श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, ‘‘हिंदु युवतींकडून जन्माला आलेली अपत्ये आत्मघातकी पथकांद्वारे बॉम्बस्फोटांसाठी उपयोगात आणली जातात, तसेच शस्त्र तस्करी, मानवी बॉम्ब म्हणूनही त्यांचा उपयोग केला जातो. खोट्या प्रेमात फसवून त्यांचे अश्लील चित्रीकरण करून त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत पैसे उकळणे, घरातील अनेकांनी त्यांचा उपभोग घेणे, पुढे वेश्यालयात त्यांची विक्री करणे, असे अनेक अघोरी आणि माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून केले जातात. हे टाळण्यासाठी हिंदु युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, तसेच इस्रायल देशात जसे कडक कायदे आहेत, तसे कायदे आपल्या देशात बनवण्यासाठी सरकारला बाध्य केले पाहिजे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात